एक्स्प्लोर
Advertisement
शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार : खोत
मुंबई : शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. 31 मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची चर्चा फिसकटल्यानंतर बळीराजाने संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी आज सकाळपासून संपावर गेले. आंदोलक शेतकऱ्यांनी जागोजागी आंदोलनं केली. आंदोलक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला, दूध रस्त्यावर ओतलं. त्यानंतर आता सरकारतर्फे सदाभाऊंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बोलणी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.
"सरकार कोणत्याही अटी ठेवून चर्चा करत नाही. शेतकऱ्यांसोबत आम्ही मार्ग काढू. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे. सगळ्यांनी चर्चेसाठी यावं. त्यामधून तोडगा काढू," असं सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत संपर्कात आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन दिलासा देण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आंदोलनकर्ते, शेतकरी नेते यांच्यासोबत चर्चेसाठी आजही सरकारची दारं उघडी आहेत. शेतकऱ्यांनीही एक पाऊल पुढे टाकत चर्चेला यावं. चर्चेतून निश्चित तोडगा निघेल. शेतकऱ्यांना आवाहन करतो हिंसक होऊ नये, शांततेत आंदोलन करावं, अन्नधान्याची-दुधाची नासाडी करु नये."
संबंधित बातम्या
शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री
LIVE UPDATE : राज्यातील बळीराजा संपावर
शेतकरी संपावर, दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement