एक्स्प्लोर

राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलणारे : सदाभाऊ खोत

आम्ही फालतू माणसं होतो, पण आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली आणि तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

सांगली : राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे. तसेच आम्ही फालतू माणसं होतो, पण आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली आणि तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय, असा टोलाही खोत यांनी शेट्टी यांना लगावला आहे. दूध दरावरून सोलापूरमध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला खोत यांनी उत्तर देताना पलटवार केला आहे. इस्लामपूरमध्ये आमदार फंडातून सुरू झालेले राज्यातील पहिले फिरते क्वारंटाईन सेंटर आमदार सदाभाऊ खोत यांनी सुरू केले, यावेळी खोत बोलत होते. दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, अशा शब्दात टीका केली होती. आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, 'हे काजू शेट्टी' तर शेट्टी म्हणाले, 'खोत भ्रमिष्ट झाले' या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकऱ्यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. आता शेतकऱ्यांच्या या साऱ्या प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. महायुतीही आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आली आहे. पण आता संघटनेच्यानेत्यांनी शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे, असं मला वाटतं, त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं, असं खोत म्हणाले.

BLOG | सत्तेपायी मैत्री तुटली! या राजकारणाने चळवळीचा इस्कोट केला!

खोत म्हणाले की, ठीक आहे, आम्ही फालतू माणसं होतो पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार, दोनवेळा खासदार होऊ शकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते बनवून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. मला वाटतं त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहायचं असेल तर सदाभाऊचं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धीच्या झोतात राहू शकत नाहीत, असे वाटत असेल. त्यामुळेच अशा भंपक माणसाविषयी फार बोलावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा, सदाभाऊच्या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. 2024 ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो, असा इशारा खोत यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget