Mansukh Hiren Case | मनसुखची हत्या करण्यासाठी वाझेंनी केला लोकलचा प्रवास, सिग्नलवरील CCTV मध्ये वाझे कैद
लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून वाझेंनी (Sachin Vaze) मोबाईल कार्यालयात ठेवून एका मिञाला तो उचलण्यासाठी ही ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.
मुंबई : मनसुख हिरण (Mansukh Hiran ) मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे (NIA) सोपवण्यात आला असला तरी रोज या प्रकरणात मृत्यू प्रकरणात रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. रोज नवीन खुलासे होत आहेत, असाच एक खुलासा समोर आला आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणे कठीण असल्याने वाझे मोबाईल ऑफिसला ठेवून ठाण्याला लोकलनं गेल्याचे तपासात समोर आले आहेत. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून वाझेंनी हे मोबाईल कार्यालयात ठेवून एका मिञाला तो उचलण्यासाठी ही ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.
दरम्यान वाझे सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर 7 च्या सुमारास CCTVमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर तो ठाणे स्थानकाबाहेर दिसले. पुन्हा लोकलनेच प्रवास करून ते भायखळाला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेले. ज्यावेळी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत त्यांचा मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. जेणेकरून ते सर्व लोकेशन एकञ दिसतील आणि वाझेंवर कुणाला संशयही येणार नाही.
माञ NIA ने हिरण हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण घटनास्थळी कोण होते. वाझेंचा रोल त्यात काय याचा तपास करत आहे. हिरण यांची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माञ शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलं आहे.
त्यामुळे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरही आता रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरण ही संशयित व्यक्ती असताना त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलं नाही. शवविच्छेदनावेळी डॉक्टरांनी वाझेंची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली. याची माहिती NIA घेत आहे.
संबंधित बातम्या :
विनायक शिंदे सचिन वाझेंच्या सांगण्यावरुन बार, पबमधून वसुली करायचा; NIA च्या सूत्रांची माहिती
मनसुख हिरण यांच्या हत्येच्या कट रचण्याच्या बैठकीला विनायक शिंदे आणि सचिन वाझे उपस्थित