एक्स्प्लोर

Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या उपस्थितीत मनसुख हिरण यांची हत्या?

एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

मुंबई :  मनसुख हिरण हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

आपल्या चौकशी अहवलात एटीएसने लिहिले आहे की, मनसुख यांच्या हत्येनंतर रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी वाझे डोंगरी येथे गेले होते. त्या दिवशीच्या यांना कोणाचाही कॉल आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये सचिन वाझे 11 वाजून 38 मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे.

मनसुख यांना तावडे नावाच्या व्यक्तीने रात्री 8 वाजून 32 मिनिटांनी फोन केला. फोन केल्यानंतर मनसुख रिक्षाने ठाण्यातील खोपट परिसरातील विकास पाल्मस आंबेडकर रस्त्यावरून गेले. मनसुख यांच्याकडे स्वत:ची कार आणि तीन मोटरसायकल असताना देखील त्यांनी रिक्षाचा वापर केला. त्याच दिवशी मनसुख यांच्या पत्नीने रात्री 11 वाजता फोन केला असता फोन बंद होता. मनसुख यांच्याकडे एक मोबाईल होता. ज्यामध्ये दोन सिमकार्ड होते. एटीएसने त्या दोन्ही क्रमांकाचे सीडीआर काढले तेव्हा त्यामध्ये मनसुख यांना शेवटचा फोन हा 8 वाजून 32 मिनिटांनी आला होता. त्यानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी चार मेसेज आले होते. चारही मेसेज आले तेव्हा त्यांचे लोकेशन वसई येथील मालजीपाडा दाखवत आहे. या सर्व घटनाक्रमानंतर एटीएसला अंदाज आहे की, मनसुख यांचे रात्री 9 च्या सुमारास अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकण्यात आला. 

अटक केलेल्यामध्ये आरोपींमध्ये माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांचा समावेश आहे.  विनायक शिंदे वाझे यांच्याशी बोलण्यासाठी खोटी कागपत्रे सादर करून सिमकार्ड खरेदी केले होते. जे सिमकार्ड शिंदे यांनी क्रिकेट बुकी नरेश गोर याच्याकडून गुजरातहून मागवले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget