(Source: Poll of Polls)
Indian Science Congress : पुरातत्व विभागाच्या 'समृद्ध भारतीय वारसा' प्रदर्शनाचे उद्घाटन
संग्रहालयात लावण्यात आलेल्या चित्रांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॅा.त्रिवेदी यांनी विषद केले. विभागाच्या पुरातत्व वस्तुंच्या संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली.
Indian Science Congress News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र शासनाचा पुरातत्व सर्वेक्षण व उत्खनन विभागाच्यावतीने भारतीय विज्ञान काँग्रेस निमित्त विद्यापिठाच्या आवारात 'समृद्ध भारतीय वारसा' या विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरु डॅा.सुभाष चौधरी, प्र.कुलगुरु डॅा.संजय दुधे, अधिष्ठाता डॅा.राजू हिवसे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॅा.प्रिती त्रिवेदी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॅा.सिंह यांनी फित कापून उद्घाटन केले.
ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव, भारतासह विदर्भातील पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणाऱ्या या प्रदर्शनाची राज्यमंत्री डॅा.सिंह यांनी पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॅा. त्रिवेदी यांनी विषद केले. विभागाच्या पुरातत्व वस्तुंच्या संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली.
तक्षशीला, हडपसर, ब्रम्हगिरी, कालीगंगा येथील उत्खननासह नागपुर जिल्ह्यातील अडम व मनसर तर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील उत्खनन व तेथे आढळून आलेल्या वास्तूंचे चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. मानवाची उत्पत्ती, प्राचीन अवजारे, गाविलगडच्या डोंगरांमधील कोरीव काम, नागपुर शहरातील वारसा स्थळे, गोंड राजकालीन किल्ल्यांचे चित्र व माहिती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.
इस्त्रोची माहिती देणारे 'स्पेस ऑन व्हिल्स'
इस्त्रोनं अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीरीत्या राबवून देशाचं नाव नाव जगभर पोहोचवले आहे. इस्त्रो या संस्थेची माहिती सर्वसामान्यांना फारशी नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी इस्त्रोची (ISTRO) 'स्पेस ऑन व्हिल्स' ही बस (मोटारगाडी) असून इंडियन सायन्स काँग्रेसमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं आपल्या मोहिमांची व आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती 'स्पेस ऑन व्हिल्स' या गाडीच्या माध्यमातून दिली आहे. यात चांद्रयान-1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोच्या एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास या गाडीमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. चांद्रयान व मंगलयान मोहीम राबविण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, मोहीमेची माहिती तसेच ही मोहीम राबविताना आलेली आव्हाने याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच या गाडीत लावलेल्या एका स्क्रीनच्या माध्यमातून इस्त्रोचा प्रारंभापासून ते आतापर्यंतचा अंतराळ प्रवास दाखवण्यात आला आहे.
ही बातमी देखील वाचा...