एक्स्प्लोर

Madha : लोकसभा तर ट्रेलर, खरा पिक्चर विधानसभेला, महायुतीला राज्यभर फटका देणार; पवारांनी साथ दिल्यावर युतीच्या 'जुना भिडू'ची गर्जना

Maha Yuti Seat Sharing : शरद पवारांनी आपल्याला हेरलं आणि संधी दिली, आता आमच्यामुळे महायुतीला राज्यभरातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात फटका बसणार असा दावा रासपने केला आहे. 

सोलापूर: लोकसभा निवडणूक हा फक्त ट्रेलर असेल, खरा पिक्चर तर विधानसभेत दिसणार असल्याचा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजप आणि महायुतीला दिला आहे. भाजपने मला डावलल्याने सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल असा दावाही त्यांनी केला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला हेरले, विश्वास टाकला, त्याचा फायदा महाविकास आघाडीला (Maha Yuti Seat Sharing) होणार असून मी माझ्या रासप चिन्हावर लढणार असल्याचंही ते म्हणाले.

भाजपकडून लोकसभा निवडणुकीत डावलले गेल्याने दुखावलेल्या महादेव जानकर यांना माढा लोकसभेतून शरद पवार यांनी उमेदवारी निश्चित केल्याची माहिती आहे. त्यानंतर महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा देताना सर्व 48 लोकसभा मतदारसंघात रासपचा दणका बसणार असल्याचे सांगितले. जो काही धनगर आणि ओबीसी समाज आमच्यामुळे भाजपसोबत होता, तो आता भाजपकडे पाठ फिरवताना दिसेल असे सांगताना लोकसभा हा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेला दिसेल असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपची परतफेड आम्ही केली

भाजपने आम्हाला मंत्रिपदाचा एक बैल दिला होता तो आम्ही भाजपकडे धनगर आणि ओबीसी समाजाची मते वळवून त्यांना परत केला होता. मात्र भाजपने आमचा आमदार फोडला, आम्हाला लोकसभेला जागा नाकारण्यात आली. त्यामुळे आता शरद पवार यांनी आम्हाला एक बैल दिला असून आता त्यांचा आणि आमचा बैल जोडून महाराष्ट्राची शेती फुलवणारी अशा शब्दात जानकरांनी महायुतीला टोले लगावले.

धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल पवारांचे आभार 

भारत स्वतंत्र झाल्यापासून भाजप किंवा काँग्रेसने आजवर कधीही धनगर समाजाला लोकसभेत पाठवले नव्हते. मात्र शरद पवार यांनी पहिल्यांदा धनगर समाजाला ही संधी दिल्याने राज्यातला धनगर समाज शरद पवार यांना धन्यवाद देत असल्याचेही जानकर यांनी सांगितले. आमच्यासाठी जे भाजपने केले होते त्याची आम्ही परतफेड केली असून आता आघाडीसोबत आम्ही असल्याने आमचा फायदा आघाडीला मिळेल असे सांगितले. 

राज्यातील एकंदर लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाचे मतदान आहे. परभणी, सांगली आणि माढा लोकसभा जागेवर मागणी करूनही भाजपने आम्हाला एकही जागा न दिल्याने आम्ही आता महाआघाडीत सामील झाल्याचे शल्य जानकरांनी बोलून दाखवले.

मोहिते आणि रामराजेंनी साथ दिल्यास चित्र वेगळं

माढा लोकसभा यापूर्वी 2019 मध्ये लढविली, तेव्हा आपण नवखे असूनही लाखभर मते मिळविली होती. आता आमचा पक्ष संघटना आणि समाज यांनी मनावर घेतले असून आता माढ्यातून 2 लाखांच्या फरकाने रणजित निंबाळकर यांचा पराभव करणार असल्याचा दावा केला. माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवार मोहिते  पाटील किंवा रामराजे निंबाळकर यांच्याकडे देतील असे राज्याला वाटत असताना शरद पवार यांनी रासप वर विश्वास दाखवला. आता याचा फायदा आघाडीला राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात दिसेल असे त्यांनी सांगितले. 

माढा रासपच्या चिन्हावरच लढणार

मोहिते आणि निंबाळकर यांची साथ मिळाल्यास 2 लाखांपेक्षा जास्त फरकाने मी येथून विजयी होईन आणि त्यांनी साथ नाही दिली तरी घासून विजय हा माझाच होणार असा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे. माढा लोकसभा ही माझ्याच म्हणजे रासप पक्षावर लढवणार असून यावेळी माढा लोकसभेचा विजय साजरा करणार असल्याचं जानकरांनी सांगितले. 

भाजपने डावलले असले तरी लोकसभेचा ट्रेलर महायुतीला दिसणार असून विधानसभेला आघाडीच्या सत्ता आल्यावर रासपचे किमान 3 ते 4 उमेदवार कॅबिनेट मंत्री झालेले दिसतील असं जानकर यांनी सांगितले. आम्ही पुढच्या भवितव्याचा विचार करून महाविकास आघाडीत आलो असून आमचा निर्णय योग्य होता हे काळ दाखवून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC Nashik | धनंजय मुंडेंनी ठरवावं की राजीनामा द्यावा का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...Job Majha | DFCCIL मध्ये ज्युनियर मॅनेजर पदावर भरती, अर्ज कसा करायचा? ABP MajhaCM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.