आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, शरद पवारांसाठी रोहित पवारांचं ट्वीट
Sharad Pawar NCP Leader tested Covid-19 positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sharad Pawar NCP Leader tested Covid-19 positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच नातू रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी आजोबा काळजी घ्या असं ट्वीट केलं आहे.
ट्वीटमध्ये शरद पवार यांनी काय म्हटलेय? -
कोरोनाची लागण झाल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही केलं आहे. ट्वीटमध्ये शरद पवार यांनी काय म्हटलेय? "माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी."
रोहित पवार काय म्हणाले? -
आजोबा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे. आजोबा, काळजी वाटतेय, पण योद्धा कधी पराभूत होत नसतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, 'आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय... योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!'
आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2022
पण मला माहित्येय... योद्धा कधी पराभूत होत नसतो!
तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!#getwellsoon@PawarSpeaks
अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनीही ट्वीट केलं आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, 'आजोबा काळजी घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल.'
आजोबा
— Parth Pawar (@parthajitpawar) January 24, 2022
काळजी घ्या
तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल https://t.co/2sEEiLlYBm
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या,'
आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे.त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 24, 2022
आदरणीय @PawarSpeaks साहेब,आराम करा आणि काळजी घ्या.#GetwellSoon