एक्स्प्लोर

रोहिणी खडसे यांचं मागच्या निवडणुकीतील नुकसान येणाऱ्या विधानसभेत व्याजासकट भरून काढू : जयंत पाटील

भाजपच्या पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याची सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन होणार की नाही? याबाबतही राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

जळगाव : एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं ते व्याजासकट येणाऱ्या विधानसभेत भरून काढू. महाराष्ट्र 15 टक्के फरकाने सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणू. त्याकरिता संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलताना केलं आहे. एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघात यावेळी खडसे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पुढील विधानसभेत रोहिणी खडसे यांना विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपने मागील विधानसभेवेळी एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारून ऐनवेळी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याची सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन होणार की नाही? याबाबतही राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

ईडी लावली तर, सीडी लावेन असं गमतीनं म्हटलेलं, पण आता खरंच ईडी लागली मागे, आता सीडी लावण्याचं काम बाकी : एकनाथ खडसे

असं काय झालं एकाएकी की नाथाभाऊ भ्रष्टाचारी ठरवून बदनाम केलं गेलं. ज्या माणसांना मी बोट धरून मोठं केलं त्यांनीच माझ्याविषयी षडयंत्र रचले. तेच गद्दार निघाले जे माणसं बापाची होत नाही ते तुमची काय होणार. या गद्दारांची पावलं आता अंड्यामधून बाहेर पडली आहेत. मी पक्ष सोडला नाही तर तुम्हीच पक्ष सोडायला भाग पाडले, अशी टीकास्त्र यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपावर सोडलं.

जलसंपदा मंत्री जळगावचे असूनही पाडळसरे धरणाच्या कामाकडे दुर्लक्ष; नाव न घेता खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

फक्त पार्टी बदलून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यामुळे नाथाभाऊला सोडायचं नाही, जाणीवपूर्वक छळून त्रास द्यायचा. त्यामुळे ईडी सारखे उपद्व्याप मागे लावण्यात आले. नाथाभाऊ गेला तर छिद्र सुद्धा पडणार नाही म्हणणारे नुसती फडफड करत राहतात. मात्र गावात निवडून यायची क्षमता नसून चार लोकं तुमच्या पाठीशी नाही. एक ग्रामपंचायत निवडून आणू शकले नाही. नेते झाले होते ते नाथा भाऊच्या बळावर असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Embed widget