एक्स्प्लोर
मनमाडजवळ चालत्या रेल्वेत चाकूचा धाक दाखवत प्रवाशांची लूट
मनमाड : चालत्या रेल्वेत प्रवाशांना मारहाण करुन त्यांना लुटण्याची घटना मनमाडजवळ घडली आहे. पुणे-गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसमध्ये ही लूट करण्यात आली आहे.
पुण्यातून गोरखपूरच्या दिशेने रवाना झालेल्या ज्ञानगंगा एक्स्प्रेसमध्ये 4 ते 5 जणांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून मोबाईल, पैसे तसंच किमती वस्तूंची लूट केली. यावेळी प्रवाशांना मारहाणही करण्यात आली. रात्री 9 वाजताच्या दरम्यान दौंड ते कोपरगाव दरम्यान ही घटना घडली आहे.
ज्ञानगंगा एक्स्प्रेसमधील जनरल डब्यात लूटीची घटना घडली आहे. मनमाड रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement