एक्स्प्लोर
धक्कादायक... कोरोनोमुळे जिल्हाबंदीसाठी रस्ता खोदला, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रकारची मदत करत आहेत. या दरम्यान जिल्हाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी जिल्हाबंदी किंवा गावबंदीसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत.

सोलापूर : कोरोनाच्या खबरदारीचा राज्य प्रशासनाने जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. करमाळा तालुक्यात चक्क रास्तच खोदून ठेवल्याने उपचाराअभावी रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची सीमा असलेल्या कोंढारचिंचोली येथील पुलाच्या पलीकडे चक्क जेसीबीच्या साहाय्याने रस्ताच उकरून टाकण्यात आला आहे. करमाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या कोंढारचिंचोलीचा पूल ओलांडताच थेट पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे जाता येते. कोंढारचिंचोली येथील शिवाजी डफळे या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी जवळ असलेल्या भिगवणला घेऊन जायचे होते. मात्र येथील रस्ताच पूर्णपणे उकरून खड्डा केल्याने गाडी पुलावर नेताच येत नव्हती. अशावेळी पुणे जिल्ह्याच्या भागातून दुसरी गाडी मागवून त्यांना उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र यात वेळ गेल्याने डोळ्यादेखत तडफडत डफळे यांनी प्राण सोडले. कोरोनासाठी जिल्हाबंदी करायचीच होती तर रस्ता बंद करायचा मात्र थेट रस्त्यावर भला मोठा खड्डा केल्याने उपचाराअभावी रुग्णाला जीव गमवावा लागला, असं मृताच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. आता जिल्हाबंदीसाठी बेकायदेशीररीत्या असा खड्डा खोदायच्या अघोरी उपाय करणाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आता तरी रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
संबंधित बातम्या :
- Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार
- आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री
- Coronavirus | राज्यातील 15 रूग्ण कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- Corona helpline numbers | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी जारी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























