एक्स्प्लोर

उष्माघाताचा धोका; जळगावनंतर अकोल्यातही कलम 144 लागू, जाणून घ्या किती आहे तापमान?

प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश 25 मे 2024 रोजी प्राप्त झाला. त्यानुसार 25 ते 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे

अकोला : उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे' पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे.  हा आदेश त्यांनी शनिवार 25 मे रोजी निर्गमित केला आहे. दरम्यान आज अकोल्यात 45.06 अंश एवढं तापमान (Summer) नोंदवण्यात आलंय. तत्पूर्वी जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा कहर पाहायला मिळत असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीही (Collector) जिल्ह्यात 144 कलम लागू केले आहे. मात्र, हे कलम लागू करण्यामागचं उद्देशही त्यांनी स्पष्ट केला आहे. तसेच, 144 लागू करणे म्हणजे संचारबंदी किंवा लॉकडाऊन नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश 25 मे 2024 रोजी प्राप्त झाला. त्यानुसार 25 ते 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे  व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 25 मे रोजीच्या दुपारी 4 वाजेपासून ते 31 मेपर्यंत फौजदारी प्रक्रीयात संहिताचे कलम 144 चे आदेश करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. 

जिल्हाधिदंडाधिकारी कुंभार यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांची राहणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी 10 वाजतापर्यंत व सायंकाळी 5 नंतर कोचिंग सेंटर चालवावेत. 

सकाळी 10 ते 5 वेळेत क्लास सुरु ठेवायचे असल्यास तेथे पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंधित क्लासच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या सात दिवसांतील अकोल्याचं तापमान 

तारीख         तापमान (सेल्सिअस अंशांमध्ये) 
18 मे           42.0
19 मे           43.2
20 मे          43.8
21 मे          44.0
22 मे          44.8
23 मे           45.5
24 मे           45.8
25 मे           45.6

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेतNew Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळाRepublic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Embed widget