Right Of Private Defence : हल्ल्यात स्वत:च्या बचाव करताना तुमच्या हातून गुन्हा घडला तर...; स्वसंरक्षणाचा अधिकार काय सांगतो?
ल्ल्यात स्वत:च्या बचाव करताना तुमच्या हातून गुन्हा घडला तर अनेकांना भीती वाटू शकते मात्र त्यासाठी IPC कलमांनुसार तुम्हाला स्वरंसक्षणाचा अधिकार आहे.
Right Of Private Defence : दर्शना पवार हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला असतानाच पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ (Right Of Private Defence) उडाली होती. त्यानंतर लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाने या तरुणीवरील हल्ला रोखला. यात तरुणीचा जीव वाचला. मात्र यातच लेशपालच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता. मात्र त्याला IPC च्या कलमांच्या अंतर्गत स्वसंरक्षणाचे काही अधिकार आहे. जे अधिकार तुम्हालाही स्वसंरक्षाणासाठी कामी उपयोगी पडू शकतात. ही कलमे आपणास माहिती असायला हवीत. महिलाच नाहीत तर प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. भारतीय कायदा देखील व्यक्तीला स्वसंरक्षणाचा अधिकार प्रदान करतो. आयपीसीचे कलम 96 ते 106 स्वसंरक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे.
IPC च्या कलम 96 ते 106 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 96 मधील स्वसंरक्षणाचा संदर्भ आहे. तर कलम 97 सांगते की प्रत्येकाला आपल्या शरीराचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि ते स्वसंरक्षणार्थ एखाद्यावर हल्ला करू शकतात. मात्र हल्ला करत असताना घटना किती गंभीर आहे, हे लक्षात आलं पाहिजे.
Right Of Private Defence : IPC चे कलम 100 काय म्हणते?
निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे सांंगतात की, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सुरक्षा, पत्नी आणि मुलांची सुरक्षा, मालमत्तेची सुरक्षा करण्याचा अधिकार आहे. इतर काही परिस्थितींमध्ये स्वसंरक्षणात एखाद्याचा जीव गेल्यास या अंतर्गत देखील सवलत दिली जाऊ शकते. आयपीसीच्या कलम 100 मध्ये स्वसंरक्षणाचा अधिकार कोणत्या परिस्थितीत वापरता येईल याचा उल्लेख आहे. यात त्या परिस्थितीवरही चर्चा केली जाते. ज्यात स्वसंरक्षणार्थ हल्ल्यावर कारवाई केली नाही तर जीव जाऊ शकतो. यामध्ये तुमच्यावर हल्ला झाला तरी तुम्ही स्वतःचा बचाव करु शकता. यासाठी पुरेसे कारण असणे आवश्यक आहे आणि ते तरतुदींनुसार सिद्ध करणे आवश्यक आहे.
Right Of Private Defence : स्वसंरक्षणाचा अधिकार कोणत्या परिस्थितीत दिला जातो हे जाणून घ्या-
1. IPC च्या कलम 103 नुसार, घर फोडणे, लूटमार, जाळपोळ आणि चोरी यांसारख्या परिस्थितीत तुमच्या जीवाला धोका असल्यास तुम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे.
2. जर कोणी तुमच्यावर अॅसिड हल्ला केला तर तुमची प्रत्युत्तराची कारवाई ही स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत कारवाई मानली जाईल.
हेही वाचा-