एक्स्प्लोर

गोवर आणि रुबेला लसीकरणानंतर तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन

लसीकरणाच्या काही तासानंतर तिघींच्या शरीरावर पुरळ येऊ लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे.

वर्धा : गोवर आणि रुबेला आजार नष्ट करण्यासाठी आजपासून सर्व शाळांमध्ये लस देण्याचे काम सुरू झाले आहे. यात वर्धा जिल्ह्यातील खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयातील 10 व्या वर्गातील दोन तर आंजी येथील शाळेतील 1 अशा तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन झाली आहे. या तीन विद्यार्थिनींना लसीकरणानंतर एडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग इमुनायजेशन (AEFI) दिसून आले. लसीकरणाच्या काही तासानंतर तिघींच्या शरीरावर पुरळ येऊ लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याची माहिती शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली आहे. गोवर रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गोवर आणि रुबेला आजारामुळे देशात दरवर्षी हजारो बालके मुत्यूमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलांना लस द्यावी. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले महाराष्ट्रात झिरो मिझेल्स व झिरो रुबेला करण्यासाठी  मोहिमेत सहभागी व्हा - आरोग्यमंत्री आरोग्य मंत्री यावेळी म्हणाले, केंद्र शासनाच्या साहाय्याने गोवर रुबेला लसीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरी व ग्रामीण भागात सुरू केला आहे. 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम 20 राज्यांमध्ये राबविली जात असून प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे  लसीकरण झाले असल्याची खात्री करावी असे आरोग्यमंत्री या वेळी म्हणाले. राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवर चे उच्चाटन व रुबेला वर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेऊन ही राज्यव्यापी मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशी आहे लसीकरण मोहीम ·       आजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम ·       9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक ·       शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध ·       या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक. ·       पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. ·       एक गोवर-रुबेला लस करते, दोन आजारांवर मात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट दिल्लीत तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis :उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस भेटीचा, EXCLUSIVE VIDEOUddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगेUddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Kapoor : जेव्हा नर्गिस यांनी राज कपूरसाठी थेट दिल्लीत तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
जेव्हा नर्गिस यांनी विवाहित राज कपूरसाठी तत्कालिन गृहमंत्री मोरारजी देसाईंना फोन फिरवला होता! दोघांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत का झाला?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, कारण नेमकं काय?
Priyanka Gandhi : काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
काल पॅलेस्टीननंतर आज बांगलादेशचा मुद्दा, प्रियांका गांधींच्या बॅगेनं लक्ष वेधलं! पाकिस्तानी खासदार म्हणाला, आमच्यात तेवढी हिंमत नाही!
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Sudhir Mungantiwar : एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
एकीकडे छगन भुजबळांच्या नाराजीने राजकारण ढवळून निघालं, तिकडे मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली गुगली
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Embed widget