अरेच्चा... रत्नागिरीत दिवंगत नेत्याविरोधात पोलिसांनी दाखल केला एफआयआर!
Ratnagiri News : रत्नागिरी पोलिसांनी शहरातील एका मोर्चाप्रकरणी दिवगंत नेते शामराव पेजे यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Ratnagiri News : कोणाही मृत व्यक्ती विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? किंवा असं झाल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल? अर्थात हे विचारण्याचं कारण म्हणजे रत्नागिरी शहर पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर. रत्नागिरी शहर पोलिसांनी दाखल केलेल्या या एफआयआरची जोरदार चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात मोर्चा काढल्याप्रकरणी कोकणचे, बहुजनांचे नेते अशी ओळख असलेल्या, तब्बल 45 वर्षे आमदार राहिलेल्या दिवंगत शामराव पेजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी हजारो नगारिकांनी मोर्चा काढला होता. ओबीसी संघर्ष समितीचा यामध्ये पुढाकार होता. त्यानंतर पोलिसांनी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जवळपास 95 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये कलम 141, 143, 149, 269 आणि 110 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गुन्हा नोंदवलेल्या आरोपींच्या यादीत कोकणचे, बहुजनांचे लोकनेते अशी ओळख असलेले दिवंगत शामराव पेजे यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्याचं नाव पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये 90 व्या क्रमांकावर आहे. या गोंधळाबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी याचा इन्कार केला. दिवंगत शामराव पेजे यांच्याविरोधात कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या स्पष्टीकरणानंतर एफआयआरमध्ये 90 व्या क्रमांकाचे आरोपी शामराव पेजे कोण, याची चर्चा जोरदार रंगली आहे.
कोण होते शामराव पेजे?
शामराव पेजे हे वर्ष 1945 ते 1990 अशी सलग 45 वर्षे आमदार होते. कोकणातील जनसंघर्षाचे त्यांनी अनेक वेळेस नेतृत्व केले आहे. त्याशिवाय ते आरडीसी बँकेचे चेअरमनदेखील होते. यमुनाबाई खेर ट्रस्टचे ते मुख्य विश्वस्त होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- धक्कादायक! ऑनलाइन गेमचा चक्रव्यूह; गेमचा टास्क पूर्ण करण्याच्या नादात मुलानं जीव दिला, मुंबईतील घटना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha