Coronavirus : JN.1 व्हेरियंटचा राज्यात झपाट्याने फैलाव, रुग्णसंख्या 110वर, पुण्यात सर्वाधिक रुग्ण
Coronavirus : JN.1 व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. दरम्यान पुण्यात या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
मुंबई : JN.1 व्हेरियंटचील (Coronavirus) राज्यातील रुग्णसंख्या ही 110 वर पोहचली असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे या व्हेरियंटचा राज्यात झपाट्याने फैलाव होत असल्याचं चित्र आहे. तसेच राज्यात गुरुवार 4 जानेवारी रोजी कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला.आज 171 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आलीये तर 117 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.
पुण्यात या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. कारण 110 पैकी 91 रुग्ण हे एकट्या पुण्यात आहेत. ठाण्यामध्ये JN.1 व्हेरियंटचे 5 रुग्ण तर बीडमध्ये तीन रुग्ण आढळून आलेत. गुरुवार 4 जानेवारी रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. सोलापुरातील खाजगी दवाखान्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे वय हे 73 वर्ष इतके होते. तसेच या रुग्णाला मधुमेह,रक्तदाब आणि दमा या समस्या होत्या, अशी माहिती देण्यात आलीये. या व्यक्तीने कोविड लासिकरणाचे दोन डोस घेतले होते. दरम्यान कोल्हापुरातील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. या व्यक्तीचे वय 101 वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला हृदयरोगाच्या समस्या होत्या. या व्यक्तीने कोविड लासिकरणाचे डोस घेतले नव्हते. अशी माहिती देण्यात आलीये.
JN.1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली
कोरोना व्हायरस JN.1 च्या नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहेत. कोरोना JN.1 प्रकार हा ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात या नवीन JN.1 सब-व्हेरियंटचे 312 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. देशातील JN.1 सब-व्हेरियंटच्या एकूण रुग्णांपैकी 47 टक्के प्रकरणे केरळमध्ये आढळल्याने प्रशासन अलर्टवर आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,565 वर पोहोचली आहे.
देशातील सध्याची स्थिती काय?
भारतात कोरोनाचा नवा JN.1 व्हेरियंट खूप वेगाने पसरताना दिसत आहे. आतापर्यंत दहा राज्यांमध्ये JN.1 सब-व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. केरळमधून 147, तामिळनाडूतून 22, कर्नाटकातून 8, गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, महाराष्ट्रात 110 आणि दिल्लीत 16 रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये 5, तेलंगणात 2 आणि ओडिशात 1 रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जेएन.1 व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे, पण धोकादायक नाही. मात्र, यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.ona patient, coronavirus updates
हेही वाचा :
Coronavirus : चिंताजनक! एका दिवसात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू; देशातील कोरोनाची सध्याची स्थिती काय?