एक्स्प्लोर
Advertisement
अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते, त्यांनी काढलेला व्हिप सर्व आमदारांना लागू : रावसाहेब दानवे
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँगेसने अजित पवारांना गटनेते पदावरुन काढलं आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून आमदार अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या गोटात सहभागी झाले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपने राज्यात सत्तास्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांवर कारवाई करत त्यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी केली असल्याचे जाहीर केले होते. परंतु राष्ट्रवादीने अजित पवारांनी विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी केलेली नसून अजित पवार अद्याप राष्ट्रवादीच्या आमदारांचे गटनेते आहेत, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, सत्तास्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे पत्र राज्यपालांकडे सादर केले. त्यावेळी ते राष्ट्रवादीचे गटनेते होते. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँगेसने अजित पवारांना गटनेते पदावरुन काढलं आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. परंतु अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर कायम आहेत. परिणामी अजित पवार जो व्हिप काढतील तोच व्हिप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना लागू होतो. त्यामध्ये कोणीही कोणत्याही प्रकारचा गैरसमज करु नये.
शिवसेनेने गेल्या काही दिवसात भारतीय जनता पक्षावर जे आरोप केले आहेत, त्या आरोपांनादेखील यावेळी दानवे यांनी उत्तर दिले. दानवे म्हणाले की, आम्ही अराजकीय मार्गाने सत्तास्थापन केल्याचा शिवसेनेचा आरोप खोटा आहे. शिवसेनेने राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केल्याचा आरोपदेखील बिनबुडाचा आहे.
दानवे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनात्मक चौकटीत राहूनच सत्तास्थापन केली आहे. सत्तास्थापनेच्या वेळी भाजपचे, राष्ट्रवादीचे गटनेते उपस्थित होते. पाठिंब्याचे पत्रदेखील सादर करण्यात आले आहे. तसेच आम्ही सर्व कायदेशीर बाबीदेखील पूर्ण केल्या होत्या. त्यानंतरच राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापन करु दिली. राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केलेली नाही.
अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही : शरद पवार | ABP Majha
आमदार फोडण्यासाठी भाजपकडून 'ऑपरेशन लोटस', 'हे' आहेत या ऑपरेशनचे शिलेदार | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement