Ramtek Lok Sabha : रामटेक मतदारसंघासाठी शिवसैनिकांचा थेट इशारा! म्हणाले, 'कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली नाही तर...'
Ramtek Lok Sabha : महायुतीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच शिंदे गटाचे विद्यामन खासदर कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
Ramtek Lok Sabha: महायुतीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच शिंदे गटाचे विद्यामन खासदर कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली आहे. एकीकडे काँग्रेसचे (Congress) आमदार राजू पारवे (Raju Parwe) यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. यावर रामटेक लोकसभा (Ramtek Lok Sabha) मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला असून उद्या अशी परिस्थिती निर्माण झल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा शिवसैनिकांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे.
कृपाल तुमाने यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे
काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर जर त्यांना रामटेकची उमेदवारी दिल्यास पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण होईल. रामटेक लोकसभा मतदारसंघात खासदर कृपाल तुमाने यांचाच पहिला अधिकार असून त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे. मात्र, जर बाहेरील उमेदवाराला पक्षात आणून उमेदवारी दिली गेली, तर पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्रित बसून आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशा शब्दात रामटेकमधील शिवसैनिकांनी पक्ष नेतृत्वाला इशाराच दिला आहे.
पक्षाचे जिल्हा संघटक अमोल गुजर यांच्या नेतृत्वात आज काही शिवसैनिकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून आम्ही सर्व कायम पक्षासोबत राहू. तसेच पक्षाने कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली, तर त्यांचे काम करू. मात्र, पक्षाने शिवसेना व्यतिरिक्त इतर पक्षाचा उमेदवार आणून त्याला उमेदवारी दिली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही अमोल गुजर आणि त्यांच्या इतर सहकारी शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
.... तर आम्ही बंडखोरी करू
पक्षात मजबूत उमेदवार असतानाही राजू पारवे यांच्या स्वरूपात बाहेरून उमेदवार आणून त्याला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये भरपूर रोष आहे. पक्ष नेतृत्वाने तसा निर्णय घेतला तर आम्हालाही आमचा निर्णय घ्यावा लागेल, असे अमोल गुजर म्हणाले. राजू पारवे यांना उमेदवारी दिली गेली तर आम्ही बंडखोरी करू की नाही हे सध्या सांगू शकत नाही. मात्र, काहीतरी वेगळे नक्कीच घडेल आणि त्यामुळे पक्षाचे नुकसान होईल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे. काही क्षमता नसलेल्या लोकांना पक्षात आणून जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, त्यामुळे पक्षश्रेष्ठी आणि खासदार कृपाल तुमाने यांच्यासोबत झालेल्या काही मतभेदांमुळे मी आज पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे गुजर म्हणाले. आता यावर शिवसेना पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश
रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात रामटेक, कामठी-मौदा, उमरेड (अनु.जाती) हिंगणा, सावनेर आणि काटोल या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग व्यापणार्या या मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती फार मोठी आहे. रामटेक लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेसकडे, दोन जागा भाजपकडे, एक जागा शरद पवार गटाकडे तर एका जागेवर एकनाथ शिंदे समर्थित अपक्ष आमदार आहेत. यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी रद्द झाल्यामुळे हा मतदारसंघ रिक्त आहे.
इतर महत्वाच्या बातम्या