एक्स्प्लोर
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य निंदनीय, करकरेंकडे त्यांच्याविरोधात पुरावे होते : रामदास आठवले
वादग्रस्त वक्तव्यानंतर साध्वींविरोधात टीकेची झोड उठली असताना आता या वादात एनडीएतील सहयोगी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.
नवी दिल्ली : शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर साध्वींविरोधात टीकेची झोड उठली असताना आता या वादात एनडीएतील सहयोगी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.
एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे साध्वींच्या विरोधात पर्याप्त पुरावे होते, असे आठवले यांनी म्हटले आहे. प्रज्ञा ठाकूर यांचं नाव मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे. हेमंत करकरेंकडे त्यांच्या विरोधात पुरावे होते, असे म्हणत त्यांनी साध्वींच्या 'माझ्या शापामुळे करकरे यांचा मृत्यू झाला' या वक्तव्याचा निषेध केला.
आठवले इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, हेमंत करकरे लोकांचे जीव वाचवताना आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. मी साध्वींच्या मताशी सहमत नाही. मी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. हा मुद्दा कोर्टाचा आहे. कोर्ट काय चूक आणि काय बरोबर ते सांगेल, असेही आठवले म्हणाले.
भाजपने प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळ लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह भोपाळमधून मैदानात आहेत. या जागेसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, मला त्यांना किंवा त्यांच्या विधानांना महत्त्वही द्यावंसं वाटत नाही. मी फक्त हेमंत करकरे यांच्याबद्दलच बोलू इच्छिते. ते रोल मॉडेल होते आणि त्यांचं नाव अभिमानानंच घेतलं पाहिजे, असं मत हेमंत करकरे यांच्या कन्या जुई करकरे-नवरे यांनी काल व्यक्त केलं होतं. मी सोशल मीडियावर प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानांबाबत वाचली. त्यात माझ्या पप्पांचं नाव आलं म्हणून मी ते अधिक उत्सुकतेनं वाचलं. त्यात पपांचं नाव नसतं, तर कदाचित मी ते वाचलंही नसतं. त्यावरच्या विविध पातळ्यांवरून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियाही वाचनात आल्या. मला वाटतं, एकट्या हेमंत करकरेंचा नाही तर सर्वच शहीदांचा मान ठेवला गेलाच पाहिजे, असेही जुई यांनी म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement