Ramdas Athawale Poem : मविआ-एमआयएम युती प्रकरणावर रामदास आठवलेंची भन्नाट कविता
मागील दोन दिवसांपासून एमआयएम आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होण्याच्या चर्चेला उधाण आलं असून यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
![Ramdas Athawale Poem : मविआ-एमआयएम युती प्रकरणावर रामदास आठवलेंची भन्नाट कविता Ramdas Athawale Poem on Shivsena Aimim alliance Ramdas Athawale Poem : मविआ-एमआयएम युती प्रकरणावर रामदास आठवलेंची भन्नाट कविता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/12/0436ec62dac079e8431d68b673493b3c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एमआयएम आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीच्या चर्चांनी उधाण घेतलं असताना या चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी एक भन्नाट कविता करत एमआयएमला खास सल्लाही दिला आहे. यावेळी त्यांनी महत्त्वाचं म्हणजे एमआयएमला एकट्याच्या बळावर लढण्याचा सल्ला दिला आहे.
एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे. पण दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमकडून महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवल्याचीही चर्चा आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीच उधाण आले. पण शिवसेना नेते, मुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडूनही युतीबाबत साफ नकार देण्यात आला. ज्यानंतर आता रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ''एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे सर्वांनी केले आहे त्यांना साईडलाईन. एमआयएमशी कोणी युती करीत नसेल तर त्यांनी एकट्याच्या बळावर लढावे.'' यातून त्यांनी एमआयएमसोबत कोणी युती करत नाही त्यामुळे त्यांनी स्वबळावर लढावे असा सल्ला कवितेच्या माध्यमातून दिला आहे.
शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून एमआयएमला सुपारी - राऊत
शिवसेनेला एमआयएमने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा भाजपचा कट आहे. शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेला 'जनाब सेना' असे संबोधणाऱ्यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांना 'शिवसंपर्क अभियानांतर्गत' संवाद साधत मार्गदर्शन केले. शिवसेना भवनात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती देण्यासाठी माध्यमांशी संवाद साधला.
संबंधित बातम्या-
- 'मविआ-एमआयएम एकत्र आले तरी फरक पडणार नाही, भाजपला हरवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न' : देवेंद्र फडणवीस
- महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा : इम्तियाज जलील
- Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याकडून Congress आणि राष्ट्रवादीला आघाडीसाठी ऑफर : ABP Majha
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)