एक्स्प्लोर

शाब्बास पठ्ठ्या!!! विमानातच गरोदर महिलेला त्रास, कोल्हापूरच्या युवकाने प्रथमोपचार करुन दाखवली तत्परता

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं असताना वैद्यकीय क्षेत्रातील अनेक माणसं प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून इतरांची मदत करत आहेत.

मुंबई : शाब्बास पठ्ठ्या.... त्यादिवशी सगळ्यांचीच गडबड सुरू होती. कसंही करून आपल्या देशात पोहोचावं यासाठी... प्रत्येकाचे प्रयत्न सुरू होते... भारतात परतण्यासाठी हे विमान शेवटचं होतं... कॅनडा वरून विमानानं उड्डाण भरलं आणि नेदरलँडच्या दिशेने येऊ लागलं. जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रत्येकालाच आपल्या मायदेशी परतण्याची ओढ होती. नेदरलँडला विमान पोहोचायला आणखीन काही वेळ होता आणि याच वेळी या विमानातील एका गरोदर महिलेला पोटात कळा सुरू झाल्या. विमानात काय करावं हे कोणालाच कळेना.

महिलेच्या वेदना वाढत होत्या. एवढ्यात विमानामध्ये अनाउन्समेंट झाली वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणी आहे का? अशी मदत मागण्यात आली. यावेळी कोल्हापूरचा रमाकांत रावसाहेब पाटील हा तरुण उभा राहिला आणि या महिलेच्या मदतीला धावला. विमानातील इतर सहकार्‍यांसोबत रमाकांतने या महिनेवर प्रथमोपचार केले. या सेवे बद्दल कृतज्ञता म्हणून रमाकांतला विमान कंपनीने शंभर यूरो बक्षीस जाहीर केले आहे.

रमाकांत रावसाहेब पाटील हा कॅनडा इथल्या हॉस्पिटलमध्ये हेल्थकेअर असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. घरगुती समारंभा निमित्ताने तो मायदेशी परतत असताना कोरोनाचे संकट जगभर उभे राहिले . कॅनडा ते नेदरलँड आणि नेदरलँड ते भारत असा त्याचा विमान प्रवास होता. स्वदेशी परत असताना शेवटचे विमान असल्याने विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली होती. याच विमानांमध्ये एक भारतीय गरोदर महिला प्रवास करत होती.

पाहा व्हिडीओ : गरोदपणाच्या काळात कोरानाच्या चाचणी किटची निर्मिती, नंतर बाळाला जन्म

विमानाने उड्डान भरताच, काही वेळेतच या महिलेला अस्वस्थ वाटू लागलं. विमान कर्मचाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन तिच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच विमानांमध्ये मेडिकल फील्डशी संबंधित कोणी असल्यास मदत करण्याचे आवाहन देखील केले. विमानात झालेली अनाउन्समेन्ट ऐकताच त्याची दखल घेत कोल्हापूरच्या रमाकांतने आपल्या नर्सिंग क्षेत्रातील ज्ञानाचा वापर करत या प्रवासी महिलेवर प्राथमिक उपचार केले. त्या दोन तासांमध्ये गरोदर महिलेची काळजी घेण्यासोबतच तिचा रक्तदाबावर नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते. मेडिकल क्रू आणि रमाकांत यांच्या दोन तासाच्या प्रयत्नाने या महिलेस आराम वाटू लागला. जेव्हा विमान नेदरलँडमध्ये उतरले तेव्हा त्या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रमाकांतच्या या कार्याची दखल घेत विमाना मधील प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. रमाकांतच्या निस्वार्थी सेवेची दखल घेत नेदरलँड विमान कंपनीने त्याला शंभर युरो बक्षीस जाहीर केले. स्वतः संकटात असताना दुसऱ्यांनाही मदतीची भूमिका करणारा रमाकांत पाटील हा प्रेरणादायक ठरला आहे. रमाकांत पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी येथील रहिवाशी आहे.

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं असताना रमाकांत सारखी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक माणसं प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून इतरांची मदत करत आहेत.

संबंधित बातम्या : 

Mann Ki Baat | 'मी तुम्हा सर्वांची माफी मागतो'; पंतप्रधान मोदींचा 'मन की बात'मधून जनतेशी संवाद

Coronavirus | जगभरात 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रूग्ण; इटलीमध्ये मृतांचा आकडा 10 हजार पार

Coronavirus | कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा हैदराबाद युनिव्हर्सिटीचा दावा

IndiaFightsCorona | कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले, मदतीचा ओघ सुरु

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार

Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget