एक्स्प्लोर

1 वाटी आमरस आणि 1 मोदक खायला दीड कोटी खर्च केला, पण शेतकऱ्यांसाठी... राजू शेट्टींचा हल्लाबोल  

सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला 1.5 कोटी खर्च केला, तिथे हेलिपॅड बनवले असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

Raju Shetti  : सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला 1.5 कोटी खर्च केला, तिथे हेलिपॅड बनवले असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी सरकारवर टीका केली. सरकारला लाज वाटत नाही. हजारो कोटी तिकडे खर्चात करता आपण शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही देत नाही असे शेट्टी म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनाचा कार्यक्रम शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन केले होते. याच स्नेहभोजनासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. अमित शहा हे रायगडवरील कार्यक्रम आटोपून तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जेवणासाठी गेले. जाताना रायगडावरून 20 किलोमीटर असलेल्या सुतारवाडीत ते हेलिकॉप्टरने उतरले. हेच हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी 4 युनिटचे हेलिपॅड तयार करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. यासाठी 7 एप्रिल रोजी 1 कोटी 39 लाख रुपयांचे टेंडरही काढले होते. एका वर्तमानपत्रात 9 एप्रिल रोजी हे टेंडर छापूनही आले होते, असे त्यांनी सांगितले होते. याच मुद्यावरुन शेट्टींनी सरकारवर टीका केली. 

सरकारनं कांद्याला सरसकट 1500 रुपये हमी भाव द्यावा

महायुती सरकारने निवडणुकींपूर्वी कर्ज माफीची घोषमा केली होती त्याचं काय झालं असा सवाल शेट्टी यांनी केला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत होत नाही असेही शेट्टी म्हणाले.   मंत्रालयात आम्ही कांदे घेऊन आंदोलन केले. जेलमध्ये गेलो. उशिरा पण सरकारला शहाणपण आले. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द केले. वेळेवर कांदा निर्यात शुल्क रद्द न केल्याने भाव पडले ही जबाबदारी सरकारची असल्याचे शेट्टी म्हणाले. सरकारनं कांद्याला 1500 रुपये हमी भाव द्यावा, आमचा नाफेडवर भरोसा नाही. 1500 रुपये सरसकट हमी भाव द्यावा असे शेट्टी म्हणाले. 
परभणी जिल्ह्यात 1.50 लाख रुपयांच्या कर्जापायी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या पत्नीने पण आत्महत्या केली ती महिला 7 महिन्याची गरोदर होती असे शेट्टी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Raigad Guardian Minister : रायगड पालकमंत्रीपदाचा वाद सुटता सुटेना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट सुनील तटकरेंच्या घरी भोजनासाठी जाणार; गोगवलेंचं स्वप्न पूर्ण होणार की नाही?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget