तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) हे घरवापसी करणार आहे. ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
Rajendra Shingane : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) हे घरवापसी करणार आहे. ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात राजेंद्र शिंगणे यांचा प्रवेश पार पडणार आहे.
नुकतीच राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा केली होती. गायत्री शिंगणे यांनी याबाबत शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील केली होती. मात्र, आता शिंगणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शिंगणे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय.
राजेंद्र शिंगणेंच्या शरद पवार गटात प्रवेशानं अजित पवार गटाला मोठा धक्का
मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राजेंद्र शिंगणे यांनी चार दिवसापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. राज्यात अनेक नेत्यांना घरातूनच विरोध झालेला आहे. त्यामुळं लोकशाहीत सर्वांना तो अधिकार आहे. आगामी काळात कोणाला किती विरोध होतो हे दिसेलच असेही शिंगणे यावेळी म्हणाले. माझी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली नाही. मात्र मी जयंत पाटलांना भेटल्याचे शिंगेण म्हणाले होते. मी जायचं तर उघडपणे जाईल, चेहऱ्यावर फाईल लपवून जाणार नाही. त्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्या गाडीत मी नव्हतोच असा खुलासा देखील शिंगणे यांनी केला होता. आगामी निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडून तुतारी चिन्हावर लढवावी असे 99 टक्के कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे वक्तव्य शिंगणे यांनी केलं होतं. 1995 पासून मी राजकारणात आहे. त्यापूर्वीही माझ्या वडिलांचे आणि शरद पवार साहेबांचे संबंध चांगले होते असे राजेंद्र शिंगणे म्हणाले होते. त्यानंतर आज अखेर आज शिंगणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: