एक्स्प्लोर
यवतमाळ, अकोल्यात पावसाची हजेरी, मराठवाड्यातही पावसाचा इशारा
मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुढच्या पाच तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली.
मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुढच्या पाच तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे.
अकोला आणि यवतमाळमध्ये पाऊस
ऐन उन्हाळ्यात अकोला आणि यवतमाळमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. अकोल्यात काल रात्री पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. रात्री 1 च्या सुमारास शहरासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस बरसला. जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा संपूर्ण शहरासह आजूबाजूच्या परिसरालाही बसला.
या पावसामुळे पिकांचे जास्त नुकसान झालं नसलं तरी उकाड्याने हैराण झालेल्या अकोलावासीयांना दिलासा मिळाला. अकोल्यासह मूर्तिजापूर आणि इतर भागातही जोरदार पाऊस बरसला.
यवतमाळमध्येही रात्री हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला असून शहरात ढगाळ वातावरण आहे. पावसानंतर यवतमाळकरांची धावपळ उडाली होती. मात्र पावसाच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement