(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत आहे : गृहमंत्री अनिल देशमुख
श्रमिक स्पेशल ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आले आहेत. अशातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वे खात्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : श्रमिक स्पेशल ट्रेनवरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वे खात्यावर मोठा आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ तडाखा बसल्याने पश्चिम बंगालच्या 26 मे पर्यंत कोणतीही ट्रेन न पाठवण्याचे पत्र रेल्वेला दिले आहे. हे पत्र पाठवल्यानंतरही आज रेल्वेने पश्चिम बंगालला जाणाऱ्या महाराष्ट्राला 35 गाड्या दिल्या आहेत. एकूणच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत असल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी केला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, पश्चिम बंगालच्या चीफ सेक्रेटरी राजीव सिन्हा यांनी 22 मे ला रेल्वे प्रशासनाला पत्र लिहले होते की ,आम्हाला 26 मे पर्यंत कोणत्याही गाड्या पाठवू नये असे असताना देखील रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 34 गाड्या पाठवण्यात आल्या. महाराष्ट्राची फजिती करण्याचा या मागे डाव आहे. महाराष्ट्राला गाड्या दिल्या असतानाही त्यांनी गाड्या पाठवल्या नाही असे ते सांगत आहे. त्यामुळे या प्रकारचा खोटारडेपणा रेल्वेमंत्र्यांनी करु नये, कोरोनाच्या संकटाच्या काळात राजकारण करु नये.
Anil Deshmukh | रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत असल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोपश्रमिक स्पेशल ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी ट्वीट करत महाराष्ट्र सरकारवर खोटारडेपणाचा आरोप केला होता. पियुष गोयल ट्वीटमध्ये म्हणाले, आम्ही महाराष्ट्रासाठी 145 ट्रेन पाठवल्या. त्याबाबतची सगळी माहिती राज्य सरकारला दिली आहे.मात्र आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 85 ट्रेन सुटायच्या होत्या. तसंच आत्तापर्यंत 27 ट्रेन्स सुटल्या आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे परप्रांतीय मजूर तिथे अडकून पडले आहेत. महाराष्ट्राला माझी विनंती आहे की, परप्रांतीय मजूरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी आमची मदत करा.
संबंधित बातम्या :महाराष्ट्र से आज शाम 6:00 PM बजे तक 145 में से 85 ट्रेनों को चलना था, जिसमें से राज्य सरकार द्वारा यात्रियों की अरेंजमेंट ना करने के कारण मात्र 27 ही चल पाई।
महाराष्ट्र सरकार से मेरा पुनः निवेदन है कृपया गरीब मजदूरों को उनके घर पहुंचाने के लिये हमारी सहायता करें। — Piyush Goyal (@PiyushGoyal) May 26, 2020