एक्स्प्लोर

Raigad Mahad Flood : महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुरात अडकलेल्यांची सुटका करणं सुरु

महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. लोकांनी घराच्या छतावर, उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील, असे आवाहन केले आहे.

मुंबई : महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

Maharashtra Rains LIVE : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, डेक्कन आणि पुण्यातील पेठांना जोडणारा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद

बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरु करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरलं आहे पण महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.  

Maharashtra Rain Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन; कोकणातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा

माणगाव  पाचाड मार्गे  महाड  रस्ता, माणगाव महाड महामार्ग, गोरेगाव  दापोली  रस्ता  सुरु  झाला  आहे अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली. कोंझर पासून पुढे  तेटघर पर्यंत  रास्ता मोकळा करण्यात आला आहे.  तेटघर पासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोली कडून नातेखिंडला पोहोचता येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! सातारा, रायगडमध्ये गावावर डोंगर कोसळले! दहापेक्षा अधिक मृत्यू, अनेक घरं गाडली

स्वयंसेवी संस्थांना आवाहन

माणगाव येथे सुमारे 2000 फुड पॉकेट्स तयार आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत अजून 2000 अन्नाची पाकिटे  तयार होतील . याबाबत तहसीलदार माणगाव ही पाकिटे गरजू लोकांना वितरणाचे नियोजन करीत आहेत.  माणगाव तहसील कार्यालयातून महाडकडे एसटी बसने खाण्यापिण्याचे साहित्य रवाना झाले आहे.  स्वयंसेवी संस्थांनी देखील यासंदर्भात महाड येथे प्रशासनाच्या संपर्कात राहावे व कपडे, अन्न याची मदत पोहचवावी  असे आवाहन केल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

Chiplun Flood : चिपळूणमध्ये छतावर अडकलेल्या 15 जणांना गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप बाहेर काढलं! 

आरोग्य यंत्रणा सज्ज

महाड मधील परिस्थितीत कोविड तसेच इतर रुग्णांना असुविधा होऊ नये याची खबरदारी  घेण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाटू लोणेरे येथे एक वैद्यकीय पथक सज्ज असून त्यांच्याकडे रुग्णवाहिका व इतर सामुग्री आहे अशी माहिती यावेळी  देण्यात आली. एमआयडीसी चे अग्निशामक दल देखील मदत कार्यात उतरले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे  चर्चेत Special Report
MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget