बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर रायगड पोलिसांची कारवाई, 12 लाख रुपयांच्या नोटा जप्त, मुख्य आरोपी जेरबंद
रायगड पोलिसांनी (Raigad Police) मोठी कामगिरी केली आहे. बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 12 लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत.
Raigad Crime News : रायगड पोलिसांनी (Raigad Police) मोठी कामगिरी केली आहे. बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 12 लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
अलिबागमधील मयेकर वाडा येथे हा संपूर्ण प्रकार समोर
रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. अलिबागमधील मयेकर वाडा येथे हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर अलिबाग पोलिसांनी या घटनास्थळावर जाऊन धाड मारली या कारवाईत 4 लाखाहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या तर अधिक तपासात एकूण 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:























