एक्स्प्लोर

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचं मध्यप्रदेशात प्रस्थान, तरीही राहुल गांधी महाराष्ट्रातच; आज औरंगाबादमध्ये

राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. 

Rahul Gandhi In Maharashtra Aurangabad: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) राज्यातून मध्य प्रदेशात प्रस्थान केलं.  राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.  'राहुल गांधी आज औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

असा असणार राहुल गांधींचा दौरा...

आज सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.

14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली यात्रा काल जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात पोहोचली. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. 

काल 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा जळगाव जामोद येथून निघून निमखेडी फाटा येथे ही पदयात्रा पोहोचली. निमखेडी फाटा येथे युनिटी ऑफ लाईट हा एक छोटेखानी कार्यक्रमपार पडला. त्यावेळी रंगीत विद्युत दिव्यांच्या सहाय्याने शानदार प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर पदयात्रा मध्यप्रदेशात जाणार गेली. 

राहुल गांधींची पुन्हा मोदी सरकारवर टीका

राहुल गांधी यांनी त्याआधी आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजप करत आहे. आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी आहेत आणि आदिवासीच राहतील. जल जंगल जमीन चा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असे राहुल गांधी म्हणाले. काल दुपारी जळगाव जामोद मध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात ते बोलत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे, पर्यावरणशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपल्यातीलच आहेत.

ही बातमी देखील वाचा 

Bharat Jodo: आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, राज्यात 14 दिवस असलेल्या यात्रेत महत्वाचं काय काय घडलं..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक 
IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक 
Nashik : नाशिकमध्ये ट्विस्ट, क्लायमेक्सचा धडाका सुरूच, आधी हेमंत गोडसेंचा फोटा गायब, आता छगन भुजबळ प्रचारातून गायब
नाशिकमध्ये ट्विस्ट, क्लायमेक्सचा धडाका सुरूच, आधी हेमंत गोडसेंचा फोटा गायब, आता छगन भुजबळ प्रचारातून गायब
Monalisa Photo : चाळीशी गाठलेल्या मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक
Monalisa Photo : चाळीशी गाठलेल्या मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक
टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...
टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Wari Loksabhechi Raver EP 21 : रक्षा खडसे की श्रीराम पाटील? कोण गुलाल उधळणार? रावेरमध्ये कुणाची हवा?Ajit Pawar Junnar Speech : साहेबांनी संधी दिली, अन्यथा  म्हशी  राखल्या असत्या, दादांचं उत्तर ऐकाKalyan Lok Sabha :आई-पत्नीने कल्याण पालथं घातलं, Shrikant Shinde यांच्या प्रचारासाठी कंबर कसलीRohit Pawar Speech Ahmednagar : पुण्यात 35 गुंडांचा जेलमधून सुटून महायुतीचा प्रचार : रोहित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक 
IPL 2024 : हैदराबादच्या वादळी विजयानंतर मुंबई प्लेऑफमधून बाहेर, पाच संघाची स्थितीही नाजूक 
Nashik : नाशिकमध्ये ट्विस्ट, क्लायमेक्सचा धडाका सुरूच, आधी हेमंत गोडसेंचा फोटा गायब, आता छगन भुजबळ प्रचारातून गायब
नाशिकमध्ये ट्विस्ट, क्लायमेक्सचा धडाका सुरूच, आधी हेमंत गोडसेंचा फोटा गायब, आता छगन भुजबळ प्रचारातून गायब
Monalisa Photo : चाळीशी गाठलेल्या मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक
Monalisa Photo : चाळीशी गाठलेल्या मोनालिसाचे फोटो व्हायरल; चाहते म्हणाले, तुझी स्माईल कडक
टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...
टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...
OTT Movies : थरार, नाट्य अन् रहस्यमय चित्रपट पाहायला आवडतात? ओटीटीवरचे हे सिनेमे नक्कीच पाहा; हॉलिवूडलाही देतात टक्कर
थरार, नाट्य अन् रहस्यमय चित्रपट पाहायला आवडतात? ओटीटीवरचे हे सिनेमे नक्कीच पाहा; हॉलिवूडलाही देतात टक्कर
न भूतो न भविष्यति, IPL च्या इतिहासात हैदराबाद पहिलाच, फक्त 58 चेंडूत 166 धावांचं लक्ष्य पार
न भूतो न भविष्यति, IPL च्या इतिहासात हैदराबाद पहिलाच, फक्त 58 चेंडूत 166 धावांचं लक्ष्य पार
Marathi Movie : अमेरिकेत मराठी चित्रपटाचे शंभर शोज 'हाऊसफुल्ल'; तुम्ही पाहिलाय का 'हा' चित्रपट?
अमेरिकेत मराठी चित्रपटाचे शंभर शोज 'हाऊसफुल्ल'; तुम्ही पाहिलाय का 'हा' चित्रपट?
हेड-अभिषेक शर्मानं कंडका पाडला, हैदराबादचा 10 विकेटनं विजय, लखनौचा दारुण पराभव
हेड-अभिषेक शर्मानं कंडका पाडला, हैदराबादचा 10 विकेटनं विजय, लखनौचा दारुण पराभव
Embed widget