पुष्पाच्या 'श्रीवल्ली' गाण्यावर आता भजनही; तबला अन् ढोलकीच्या तालावर कोकणात रंगला किर्तन सोहळा
Srivalli Bhajan Version : तबला अन् ढोलकीच्या तालावरली 'श्रीवल्ली' गाण्याचं भजन व्हर्जन सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
![पुष्पाच्या 'श्रीवल्ली' गाण्यावर आता भजनही; तबला अन् ढोलकीच्या तालावर कोकणात रंगला किर्तन सोहळा pushpa srivalli bhajan viral pushpa song srivalli bhajan version goes viral पुष्पाच्या 'श्रीवल्ली' गाण्यावर आता भजनही; तबला अन् ढोलकीच्या तालावर कोकणात रंगला किर्तन सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/07/9d6a0822aa0ad2dc39914761c430541d_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Srivalli Bhajan Version : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा : द राईज' (Pushpa The Rise) या चित्रपटाची जादू जगभर पाहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांपासून ते क्रिकेटपटूंपर्यंत या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांवर रील्स आणि फनी व्हिडिओ बनवले जात आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो खूप व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मंडळ भजन कीर्तन करताना दिसत आहे. पण गंमत म्हणजे या भजन मंडळात पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली (Srivalli) गाणं गात आहे. यात विशेष म्हणजे तबल्याच्या तालावर आणि ढोलकाच्या तालावर श्रीवल्ली गाण्याचं भजन व्हर्जनही सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.
पूर्ण व्हिडिओ पाहा
हा व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून चाहत्यांनाही हा प्रयोग खूप आवडला आहे. नेटिझन्स या व्हिडिओला प्रचंड लाईक आणि शेअर करत आहेत, तसेच कमेंट बॉक्समध्ये अतिशय मनोरंजक प्रतिक्रियाही देत आहेत. अलिकडेच या गाण्याचं मराठी व्हर्जनही जोरदार व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.
'पुष्पा' चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी इतकी प्रसिद्ध होत आहेत की अनेक परदेशी सेलिब्रिटीही त्यावर व्हिडिओ बनवत आहेत आणि सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुनने पुष्पाची मुख्य भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या :
- Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी
- Rose Day : प्रेमाचं प्रतिक असलेलं 'गुलाब'; आपल्या प्रिय व्यक्तींना द्या अन् मनातल्या भावना व्यक्त करा
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)