एक्स्प्लोर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता, मंगळवारी अधिकृत निर्णय

Solapur University Exam : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. याबाबत मंगळवारी अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे. प्रभारी परीक्षा संचालक श्रणिक शाह यांनी ही माहिती दिली आहे. 

सोलापूर  : सोलापूर शहरात 31 मार्चपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केले आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संदर्भात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र पालिका आयुक्तांनी काढलेल्या या आदेशामुळे परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता जास्त आहे. 

अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही

मात्र या संदर्भात मंगळवारपर्यंत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक श्रणिक शाह यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. सोलापूर शहरातील महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन घ्यावे लागण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. सोमवारी विद्यापीठात सिनेटची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे सोमवारी देखील प्रशासकीय बैठक होण्याची शक्यता कमी आहे. जर सोमवारी प्रशासकीय बैठक झाली तर सोमवारी अन्यथा मंगळवारी परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक श्रणिक शाह यांनी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना दिली. 

विद्यापीठाकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात द्वितीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठाने ऑनलाईन घेतल्या होत्या. मार्च अखेरीस आणि एप्रिल महिन्यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. जवळपास 35 हजार विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत. राज्यभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार सोलापूरची परिस्थिती पाहता विद्यापीठाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी केलेली आहे. मात्र सोलापुरात देखील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतोय. त्यात शहरातील महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आल्याने विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेण्याची शक्यता जास्त आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget