एक्स्प्लोर

Pune News : नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प आमच्या जीवावर उठला; कोरेगाव पार्कमधील संतप्त स्थानिकांचा आरोप

Pune News : पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात असलेल्या पॉप्यूलर हाईटस-2 या इमारतीची कंपाउंड वॉल कोसळलीय. मात्र त्यानंतर आता या इमारतीच्या मागचा भाग देखील कोसळायला सुरुवात झाली आहे.

Pune Rain Update पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात असलेल्या पॉप्यूलर हाईटस-2 या इमारतीची कंपाउंड वॉल कोसळलीय. परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) ही संरक्षण भिंत शनिवारच्या रात्री एक वाजताच्या सुमारास कोसळलीय. मात्र त्यानंतर आता या इमारतीच्या मागचा भाग देखील कोसळायला सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या मागच्या भागाला मोठे भगदाड पडलय. परिणामी, या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना घर खाली करण्यासाठी महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही इमारतीतील 60 फ्लॅटमधील साधारत 300 ते 400 लोकांना स्थलांतरित करण्यात आल आहे.

अशातच, आम्हाला आमच्या इमारतीमागे असलेली भिंत पुन्हा बांधून द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी या इमारतीत राहणाऱ्या रहिवासीयांकडून करण्यात येत आहे. सोबतच पुण्यात झालेल्या पुरस्थितीला नदी सुशोभीकरण प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोपही कोरेगाव पार्कमधील संतप्त स्थानिकांनी केला आहे.

नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प आमच्या जीवावर उठला

पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज(रविवारी) पहाटेच्या सुमारास काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला (Pune Rain Update) येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच कोरेगाव पार्क मधील पॉप्यूलर या हाइट्स या हाउसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने पडलीय. पावसाचा जोर लक्षात घेता ही बहुमजली इमारत कोसळण्याची भिती  महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेत्या संगीता तिवारी यांनी प्रशासनाकडे वेळीच खबरदारी घेण्याची विनंती केली होती. तर संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिकेच्या वतीने येथील नागरिकांना घर खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र ही घटना घडण्यामागे नदी सुशोभीकरणाचा प्रकल्पच कारणीभूत ठरला असून हा प्रकल्प आमच्या जीवावर उठला असल्याचा रोष स्थानिकांनी व्यक्त केला आहे. 

नागरिकांना घर खाली करण्यासाठी महानगरपालिकेचे नोटीस 

पॉप्यूलर हाईटस  2 (विंग B)  या इमारतीची उत्तर बाजूची भिंत धोकादायक स्थितीमध्ये आहे. त्यामुळे या सिमाभिंतीस आणि  इमारतीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण राहत असलेली इमारत धोक्याची झाली असून ती केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण राहत असलेली जागा धोका टळेपर्यंत तात्काळ मोकळी करणे आवश्यक आहे. आपणांस नोटीस देण्यात येते की, ही नोटीस पोहोचल्यानंतर आपण आपल्या ताब्यातील जागा मोकळी करावी व जीवित आणि वित्त हानी टाळण्याचे दृष्टीने आमच्याशी सहकार्य करावे.

यदाकदाचित आपणाकडून याप्रमाणे तजवीज न झाल्यास महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या अधिकारान्वये नाईलाजाने आम्हास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम २६८ (७) अन्वये असलेले अधिकार वापरावे लागतील आणि गरज पडल्यास पोलिसांच्या मदतीने आपण राहत असलेली जागा मोकळी करुन घ्यावी लागेल. आपण समंजसपणा दाखवाल आणि आमच्यावर अधिकार वापरण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा आहे. अशा शब्दात महानगरपालिकेने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget