एक्स्प्लोर

Panshet Dam: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणशेत धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर तर धरण साखळीत 'इतका' पाणीसाठा

Panshet Dam: पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. पानशेत धरण जलाशय आज (28 जुलै) सकाळी 5:00 वाजता 94% टक्के क्षमतेने भरले आहे.

Panshet Dam: पुणे शहर परिसरात गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे शहर (Pune Rain Update) परिसरातील धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पानशेत (Panshet Dam) व वरसगाव धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे काल (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणात 1.36 टीएमसी (68.77 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. तसेच धरणसाखळीत पाच वाजेपर्यंत 24. 07 टीएमसी म्हणजे 82.58 टक्के इतका साठा झाला होता. पानशेत धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असून, या धरणात 92.68 टक्के जलसाठा झाला आहे.

पानशेत धरण (Panshet Dam) पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. पानशेत धरण जलाशय आज (28 जुलै) सकाळी 5:00 वाजता 94% टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारे पाणी वाढत गेल्यास कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी धरण परिसरात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, त्याचबरोबर नारगिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

पाणशेत धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर

गेल्या 24 तासांमध्ये धरणसाखळीत 1.45 टीएमसीची पाण्याची भर पडली आहे. खडकवासला धरणात शुक्रवारी सायंकाळी 1.03 टीएमसी म्हणजे (51.99 टक्के) पाणी होते. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला पुन्हा शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरण माथ्यावर पावसाचा (Heavy Rain Update) जोर ओसरला आहे. मात्र, पानशेत आणि वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरी पट्ट्यात शुक्रवारी संततधार पाऊस झाल्याने शनिवारी पावण्याची आवक वाढली आहे.

पुण्यात पुन्हा पावसाला सुरूवात

पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज(रविवारी) पहाटेच्या सुमारास काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला (Pune Rain Update) येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार

खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता पाच हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणारSpecial Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवरSpecial Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरीSpecial Report Fadnavis inaugurates bridge : बांधून दाखवलाच, गडचिरोलीतल्या पुलाची कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Embed widget