Pune Pmc News : पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय; मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची औषधं नागरिकांना मोफत मिळणार
कोरोना संसर्गानंतर (Corona) तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच पुणे पालिकेकडून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत औषधं मिळणार आहे.
Pune Pmc News : मागील काही वर्षापासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या (Pune News) रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बदलत जाणारी लाईफस्टाईल (Lifestyle) आणि कोरोना संसर्गानंतर (Corona) तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच पुणे पालिकेकडून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत औषधं मिळणार आहे.
पुण्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे महापालिकेला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांर्तगत 43 लाखांचा निधी मिळाला आहे. पालिकेच्या सर्व दवाखान्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत जेनेरिक औषधी देण्याचा निर्णय घेतला आहे.30 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये 25% लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास तसेच 12% लोकांना मधुमेहाचा त्रास असल्याचे दिसून आलं आहे. पालिकेच्या वैद्यकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्डची गरज असते मात्र या औषधांसाठी कार्डची गरज लागणार नाही आहे. सगळ्या पालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत औषधे मिळणार आहे. ही औषधी मिळविण्यासाठी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रक्त तपासणीचा अहवाल लागणार आहे.
पुणे महानगरपालिका यावर्षीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरील जेनेरिक औषधे मनपाच्या रूग्णालयांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत. त्यामध्ये शुगर आणि बीपीसाठी 6 प्रकारची औषधे असणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीला पाठविला आहे.
कोरोनानंतर तरुण रुग्णांमध्येही वाढ
कोरोनानंतर मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यात वयस्कर रुग्णांसोबतच तरुण रुग्णांमध्येही चांगलीच वाढ झाल्याचं बघायला मिळालं आहे. सध्या तरुणांना भरपूर वर्कलोड आहे. त्यात कोरोनानंतर प्रत्येकाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. त्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे अनेकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबासोबत इतर आजारांनीदेखील ग्रासलं असल्याचं समोर आलं आहे.
ससूनमध्ये सगळी औषधं मोफत...
डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत, (Sassoon Hospital) यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार संचालित ससून हॉस्पिटल पुणे यांनी उपाययोजना केल्या आहेत. रूग्णांना स्वतःची औषधे, सिरिंज किंवा इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागणार नाही, याची खात्री करण्यासाठी रूग्णालयात 255 आवश्यक औषधे आणि 480 वारंवार लिहून दिलेली औषधे आता रुग्णालयाकडूनच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.आहेत. सरकारी रुग्णालयात येणारे रुग्ण सामान्यतः आर्थिक दृष्या सक्षम नसतात आणि त्यांना स्वतःच्याऔषधांसाठी पैसे देण्यास सांगणे, चुकीचं आहे त्यामुळे आता सर्वांना मोफत औषधं मिळणार आहे.