Pune Crime news : पुणे हादरलं! थांब, तुला टी-शर्ट घालण्यास मदत करतो म्हणत दुकानदारानेच केले अश्लील चाळे
टी-शर्ट घालण्यास मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Pune Crime News : टी-शर्ट घालण्यास (Pune Crime News) मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात महिनांसोबत होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच या घटनेने पुन्हा एकदा महिलेल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील एमजी रोडवर एक तरुणी टी-शर्ट घ्यायला गेली होती. त्यावेळी ती ते टीशर्ट व्यवस्थित असल्याचं बघत होती. त्यानंतर ती टीशर्ट घालून बघत होती. याचवेळी त्या दुकानातील कामगाराने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आपण तुला टी-शर्ट घालण्यास मदत करतो", असा बहाणा करत तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी 20 वर्षीय पीडित तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन कैफ करीममुल्ला शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिन्याभरापूर्वी अशीच घटना...
काही दिवसांपूर्वी परराज्यातून नोकरीसाठी बोलावून एका तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली गोती. ही घटना 6 मे ते 6 जून या महिन्याभरात पुणे आणि पिंपरीत घडल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. त्यानुसार चौघांविरोधात पिंपरीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ नोकरीच्या उद्देशाने पुण्यात आलेल्या या पीडित तरुणीने कशीबशी यातून सुटका करुन घेतली आणि स्वतःला सावरत पिंपरी पोलीस स्टेशन गाठले होते.
पुण्यात महिला असुरक्षित?
दर्शना पवार प्रकरण आणि त्यानंतर भररस्त्यात मुलीवर कोयत्याने हल्ला केला होता. त्यानंतर पुण्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतरही पुण्यात दोन तीन किरकोळ घटना समोर आल्या आणि पुणे पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी कंबर कसली. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या नोकरदार महिलांची, विशेषतः आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विशेष सुरक्षा मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांचा सहभाग असेल.
पुणे पोलिसांनी कोणत्या उपाययोजना केल्या?
-शहरभर पोलीस दलाने रात्रीची गस्त वाढवली.
-आयटी कंपन्यांमध्ये सुरक्षा जागरुकता उपक्रम आयोजित करणे.
-रिक्षाचालकांचे परवाने तपासणे, तसेच उबेर आणि ओला सारख्या प्लॅटफॉर्मवरुन खाजगी वाहने आणि चालकांची छाननी करणे.
-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे.
-शहराबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करुन लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक आणि रेल्वे-स्थानकांच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
-उशिरापर्यंत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर आणि गुन्हेगारी नोंदी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा-