एक्स्प्लोर

Pune News : पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित, हलगर्जीपणाचा ठपका, दिरंगाई भोवली

Pune News : या घटनेची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी उपनिरीक्षक गाडेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्राच्या (Lalit Kala Kendra) आवारात तोडफोड प्रकरणी आता नवीन माहिती समोर येतेय. या घटनेवेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांकडूनच हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर (Sachin Gadekar) यांना निलंबित करण्यात आले आहे, याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे, दरम्यान गाडेकर यांच्याकडून घटनेची योग्य दखल न घेतल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याच प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. 

गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जातोय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारी संध्याकाळी पाच वाजता तोडफोड करण्यात आली. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल निलंबन करण्यात आलं. मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याच प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. कारण ललित कला केंद्राच्या कार्यालयाला शनिवार सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. अनेक पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी ललित कला केंद्राच्या भोवती तैनात होते. 

पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का?

एबीपी माझाने देखील शनिवारी दुपारी एक वाजता याविषयीची बातमी दाखवली होती. मात्र संध्याकाळी पाच वाजता हा बंदोबस्त अचानक बाजूला करण्यात आला. ज्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यासाठी रान मोकळ झालं. त्यानंतर पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का? हा प्रश्न विद्यापीठाच्या आवारात विचारला जातोय. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच निलंबन करण्यात आलंय.  मात्र विद्यापीठात बंदोबस्तासाठी पन्नासहून अधिक पोलीस तैनात असताना तोडफोड झालीच कशी? अचानक पोलीस कॉन्स्टेबलना बाजूला होण्याच्या सुचना कोणी दिल्या? या घटनेच खापर एकट्या पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांच्यावर का फोडल जातय? या प्रश्नांची उत्तरं पुणे पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न 

ज्यावेळी ललित कला केंद्राच्या आवारात ही घटना घडली, त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांच्यासह अनेक पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र इतका बंदोबस्त असतानाही ही घटना घडलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तोडफोड झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर बंदोबस्तावरील पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांनी घटनेची योग्य दखल घेतली नाही, तसेच नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी उपनिरीक्षक गाडेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

चौकशी समितीची स्थापना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीच्या ललित कला केंद्रात सादर झालेल्या वादग्रस्त नाटक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आलीय. विद्यापीठ प्रशासनाने स्थापन केलेल्या या चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे असणार असून समितीच्या इतर सदस्यांमधे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचाही समावेश करण्यात आलाय. चौकशी समितीच्या इतर सदस्यांमधे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते विनायक आंबेकर यांचा समावेश आहे. ही समिती एक महिन्याच्या कालावधीत चौकशी करून त्याचा अहवाल कुलगुरूंना सादर करणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

नेमकं काय घडलं?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 2 फेब्रुवारीला रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.  यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.  या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती. 

सहा जणांना अटक 

या प्रकरणी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना नाटकाबाबत अटक करण्यात आली आहे. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक,  काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आली

हेही वाचा>>>

Pune News : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित कला केंद्राच्या प्रमुखासह सहा जणांना अटक, कुलगुरुंची भूमिका काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
×
Embed widget