एक्स्प्लोर

Pune News : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित कला केंद्राच्या प्रमुखासह सहा जणांना अटक, कुलगुरुंची भूमिका काय?

पुणे : ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना नाटकाबाबत अटक करण्यात आली आहे

पुणे : ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना नाटकाबाबत अटक (Savitribai Phule Pune University)  करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 'जब वी मेट' हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आलं आहे. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते.

ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक,  काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आलीय.  दुपारी न्यायालयात त्यांना हजर करण्यात येईल.

नेमकं काय घडलं होतं?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून 2 फेब्रुवारीला रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.  यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.  या नाटकांत राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती. त्यामुळे हा सगळा राडा झाला.

चालू नाटक बंद पाडणे योग्य नाही: विभावरी देशपांडे

या प्रकरणावर आता कलाक्षेत्रातील काहींनी आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी चालू नाटक बंद पाडणे, गोंधळ घालणे , धक्काबुक्की करणे योग्य नाही, असं मत व्यक्त केलं आहे. 'एखादी कलाकृती, कलाविष्कार न पटणे, न आवडणे, राग येणे, भावना दुखावणे हे मला मान्य आहे. तो निषेध व्यक्त करण्याचे विविध मार्ग लोकशाही व्यवस्थेत आहेत. चालू नाटक बंद पाडणे, गोंधळ घालणे , धक्काबुक्की करणे योग्य नाही', असं त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

कुलगुरूंनी भूमिका मांडावी; मनसे चित्रपटसेना आक्रमक

त्यासोबत मनसे चित्रपट सेनेनेदेखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी घडलेल्या प्रकाराला थेट विरोध केला आहे. नाटक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मनसे चित्रपटसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष चेतन धोत्रे यांनी घेतली आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणावर विद्यापीठाचे कूलगुरूंनी योग्य भूमिका मांडावी, अशी मागणी फेसबूक पोस्ट करत केली आहे. तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या घरात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी नाही. याचे भान ठेवून विद्यापीठात वागा. हीच वाक्ये मुस्लिम अथवा ख्रिश्चन पंथातील देवतांच्या तोंडातून सांगायचे धाडस यांच्यात आहे काय ?अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त हिंदू धर्मातील देवतांच्या तोंडात शिव्या देऊनच मिळते काय  ? इतके सगळे होऊन सुद्धा कुलगुरूंनी त्यांची भूमिका मांडली नाही. आता फक्त त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे. दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी, असं चेतन धोत्रे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune News : पुणे विद्यापीठ चौकाजवळ मालवाहू ट्रेलर उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहतुकीत बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget