एक्स्प्लोर
पुण्यात शुक्रवार पेठेतील दोन्ही वाड्यांची आग आटोक्यात
पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेत दोन वाड्यांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या आगीत एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.
शुक्रवार पेठेतील एका तीन मजली जुन्या वाड्याला आज पहाटे चारच्या सुमारास आगली. वाड्यात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली.
परंतु ही आग शेजारच्या वाड्यापर्यंत पोहोचली. दुसऱ्या वाड्याची आग विझवताना भिंत कोसळल्याने अग्निशमन दलाच्या चार जवानांसह एक स्थानिक नागरिक जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान नागरिकाचा मृत्यू झाला.
अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने एका वाड्याच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. तर सकाळी साडेआठच्या सुमारास दुसऱ्या वाड्याची आग आटोक्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन सुरु केलं आहे.
दरम्यान या वाड्यांशेजारी असलेले इतर वाडे रिकामे करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement