(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात परप्रांतीय प्रेयसी बेपत्ता, पत्रकार प्रियकर चौकशीसाठी ताब्यात
पिंपरी चिंचवडमधील एका वेबसाईटच्या पत्रकाराने दोन दिवसांपूर्वी त्याची प्रेयसी हरवल्याची तक्रार केली. मात्र आज या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं.
Pimpari chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमधील एका वेबसाईटच्या पत्रकाराने दोन दिवसांपूर्वी त्याची प्रेयसी हरवल्याची तक्रार केली. मात्र आज या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. कारण पोलिसांनी उलट तपासणी केली अन् आज पत्रकारालाच ताब्यात घेतलं. यामुळं शहरात खळबळ उडाली. हा पत्रकार मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील असून प्रेयसी मूळची ओडिसाची आहे. हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याची कल्पना प्रेयसीच्या कुटुंबियांनाही होती. ठोस पुरावा मिळाल्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे, त्यानंतर पत्रकारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. संबंधित पत्रकाराला ताब्यात घेतल्यावर सर्वांनाच धक्का बसला. त्याचा स्वभाव पाहता तो असं काही करेल याचा अद्याप ही कोणाला विश्वास बसेना.
अद्याप एक ही पुरावा न मिळाल्याने तूर्तास तरी मिसिंगच्याच तक्रारीवर तपास सुरू आहे. ठोस पुरावा मिळाल्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे, त्यानंतर पत्रकारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. संबंधित पत्रकाराला ताब्यात घेतल्यावर सर्वांनाच धक्का बसला. त्याचा स्वभाव पाहता तो असं काही करेल याचा अद्याप ही कोणाला विश्वास बसेना.
12 ऑगस्टला तिचं कुटुंबियांशी शेवटचं बोलणं झालं. अन 13 ऑगस्टपासून ती बेपत्ता झाली. पण पत्रकाराने मिसिंगची तक्रार दोन दिवसांपूर्वी केली. त्यात ही तक्रार करताना सांगितलेल्या कथेत खोटेपणा दिसून आला. त्यामुळं पोलिसांनी उलट तपासणी केली. आज सकाळी पुन्हा त्या पत्रकाराला बोलावलं अन कसून चौकशी केली. तेंव्हा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली पण पोलिसांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पण तो अनुत्तरित राहिला.
त्यामुळं पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला आहे. मिसिंगची तक्रार दिल्यापासून पत्रकार खोटी माहिती देत असल्यानं भोसरी पोलिसांना त्याच्यावर विश्वासच बसेना. नेमकं त्याने प्रेयसी सोबत काय केलं? ती पावणे तीन महिन्यांपासून बेपत्ता होती तर मग तक्रार दोन दिवसांपूर्वी का दिली? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत.
पत्रकाराच्या प्रेयसी संबंधित अद्याप एक ही पुरावा न मिळाल्याने तूर्तास तरी मिसिंगच्याच तक्रारीवर तपास सुरू आहे. ठोस पुरावा मिळाल्यावर पुढची कारवाई केली जाणार आहे, त्यानंतर पत्रकारावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. संबंधित पत्रकाराला ताब्यात घेतल्यावर सर्वांनाच धक्का बसला. त्याचा स्वभाव पाहता तो असं काही करेल याचा अद्याप ही कोणाला विश्वास बसेना.
ही बातमी देखील नक्की वाचा