एक्स्प्लोर

Crime : गुंगीचं औषध टाकून केलं असं कृत्य की... मित्रांनीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला 40 लाखांना लुटलं, एकाला कोल्हापुरातून अटक

डोंबिवलीतील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करुन चाळीस लाखाचे दागिने उकळल्याचा प्रकार समोर आलाय. डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी कोल्हापूरहून एका आरोपीला अटक केली आहे. 

Dombivali Crime news:  डोंबिवलीतील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करुन त्याच्या मित्रांनीच चाळीस लाखाचे दागिने उकळल्याचा प्रकार समोर आला आगे. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये नशेचे औषध टाकून या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी तरुणाला पाजले. त्यानंतर एका तरुणीसोबत त्याचा अश्लील व्हिडीओ काढून घेतला. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  करण्याचे नावाखाली तरुणाकडून दोन वर्षात चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम सोने उकळले. कोल्हापूरमध्ये (Kolhapur news) इंजिनिअरिंगचा शिक्षण घेणारा डोंबिवलीतील तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. 

या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी (Tilak Nagar Police) एका आरोपीला अटक केली आहे. संजय राजपूत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले मात्र कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगत तरुणाला धमकावले

डोंबिवलीत राहणारा एक तरुण कोल्हापूरमधील एका मोठ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.  2020 मध्ये हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत एका फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी पीडित तरुणाच्या मित्रांनी सॉफ्ट ड्रिंक्समध्ये गुंगींचे औषध टाकून त्याचे एका तरुणीसोबतचे अश्लील व्हिडीओ काढले. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याचे सांगत त्या तरुणाला धमकावले. पीडित तरुणाला सातत्याने धमकावत त्याच्याकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले आहेत. हे कृत्य करणारे पीडित तरुणाचे मित्रच होते. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव संजय राजपूत असे आहे. तो कोल्हापूर येथील इचलकरंजी येथे राहणार आहे.

टिळकनगर पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना

या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहे. त्यात त्यांचा काय सहभाग आहे याबाबत पोलिसांकडून त्याचा तपास सुरु आहे. तपसासाठी टिळकनगर पोलिसांचे तपास पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. अटक आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी आणि आरोपींच्या जाब जबाबात तफावत येत असल्याने पोलिस अन्य अंगानेही या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. 

ही बातमी देखील वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari  Akola : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर;मिटकरींचा दावाDevendra Fadnavis Jamner : जामनेरमध्ये महाजनांपेक्षा त्यांच्या पत्नीलाच जास्त मतं मिळतील - फडणवीसTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :12 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget