एक्स्प्लोर

Pune Bypoll election : कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे, अजित पवार मैदानात

कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला.

Pune Bypoll election :  कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.

कसब्यात भाजपच्या हेमंत रासने (Hemant rasne) विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांच्यात तगडी लढत आहे. त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul kalate) यांच्यात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांनी मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. 

कसब्यात कसा झाला प्रचार?

कसबा मतदार संघात आज भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. शेकडो नेते, कार्यकर्ते आणि कसबेकरांच्या उपस्थित भव्य रो़ड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शो नंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. पुण्याचा विकास करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळे हेमंत रासने यांनाच मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं. त्याच बरोबर महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनीदेखील प्रचार रॅली आयोजित केली होती. त्यांनी देखील मीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटचे काही तास शिल्लक राहिल्याने दोन्ही बाजूने प्रचाराला वेग आला आहे.

चिंचवडमध्ये प्रचाराची रणधुमाळी

चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (rahul kalate) या तिघांनी धुमधडाक्यात प्रचार केला. अश्विनी जगताप यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. नाना काटे यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या तर संपूर्ण प्रचारादरम्यान कायम मतदारांच्या भेटी घेणाऱ्या राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशी मात्र शक्तीप्रदर्शन केलं. अश्विनी जगताप यांनी प्रचारयात्रा करत मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी रोज रोड शो घेतले. मात्र आज त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. घरोघरी जाऊन मतदानाचं आवाहन केलं. त्यानंतर अपक्ष उमेदवार यांनी या सगळ्या प्रचारादरम्यान पदयात्रेवर भर दिला होता. मात्र प्रचार संपण्यासाठी काही तास बाकी असताना त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
×
Embed widget