Prophet Mohamamd Row : नुपूर शर्माला भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स जारी
Prophet Mohamamd Row : नुपूर शर्मा यांना 13 जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले आहे.
ठाणे : वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्याने रझा अकादमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक यांनी 30 मे रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मावर भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. काल ( शुक्रवारी )रझा अकादमीच्या सदस्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांची भेट घेऊन शर्मांवरील दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी केली. त्यानंतर नुपूर शर्मा यांना 13 जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी नवीन जिंदाल यांनाही समन्स जारी ..
भाजप प्रवक्ता शर्मा यांनी 27 मे ला मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ व श्रद्धास्थान कुरान आणि अल्लाहचे नबी मोहम्मद पैगंबर व त्यांची पत्नी हजरत आयेशा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे 30 मे रोजी रझा अकादमीचे भिवंडीतील सदस्य वकास मलिक यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे त्यापाठोपाठ 4 जून रोजी भाजपचे निलंबित नेते नवीन जिंदल यांच्यावरही भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन दिवसापूर्वीच त्यांनाही 15 जून रोजी गुन्ह्यासंदर्भात पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स पाठिण्यात आले. त्यातच काल (शुक्रवारी ) नुपूर शर्मा यानांही 13 जून रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याने दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शांतता राखण्याचे आव्हान
दरम्यान रझा अकादमीचे भिवंडीचे महासचिव शरजील रझा कादरी यांनी मुस्लिम बांधवाना शांतता राखण्याचे आव्हान करत भिवंडी पोलीस त्याच्या कायदयानुसार नुपूर शर्मावर कारवाई करणार आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळण्याची भिवंडी पोलिसांकडून पूर्ण सहकार्य मिळाल्याने भिवंडी पोलीस प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले.
संबंधित बातम्या :