Al-Qaeda Threat : नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात 'अल कायदा'ची उडी; दिल्ली, मुंबई, गुजरात उडविण्याची धमकी
Al-Qaeda Threat : प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al-Qaeda) भारतात आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली
![Al-Qaeda Threat : नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात 'अल कायदा'ची उडी; दिल्ली, मुंबई, गुजरात उडविण्याची धमकी al qaeda threatens suicide attacks in india over prophet mohammad remarks row marathi news Al-Qaeda Threat : नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात 'अल कायदा'ची उडी; दिल्ली, मुंबई, गुजरात उडविण्याची धमकी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/08/dd831a7546f9c44d976d22b96b7a35f3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Al-Qaeda Threat : प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून दहशतवादी संघटना अल-कायदाने (Al-Qaeda) भारतात आत्मघाती हल्ला करण्याची धमकी दिली आहे. दहशतवादी संघटनेने धमकीच्या (Threat) स्वरात म्हटले आहे की, भाजपच्या प्रवक्त्यांनी टीव्हीवर इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे. अल कायदाने गुजरात, यूपी, बॉम्बे आणि दिल्लीत आत्मघातकी हल्ला करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपने रविवारी पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वातून 6 वर्षांसाठी निलंबित केले.
नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात अल कायदाची उडी
भाजपने नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख होते. नुपूर शर्मा 27 मे रोजी एका खासगी वाहिनीच्या चर्चेत सहभागी झाल्यापासून हे प्रकरण सुरू झाले. यादरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या वादावर चर्चा होत होती. पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यादरम्यान नुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांच्यावर काही कथित टिप्पणी केली होती. यानंतर नुपूर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्यावर पैगंबरांचा अपमान केल्याचा आरोप केला. यानंतर देशभरात भाजपविरोधात जोरदार निदर्शने झाली आणि नुपूर शर्माच्या अटकेची मागणीही जोर धरू लागली.
आखाती देशांमध्येही संताप
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर मुस्लिम देशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या टिप्पण्यांबाबत अनेक आखाती देशांनी अधिकृतपणे भारताकडे निषेध नोंदवला आहे. दुसरीकडे, कुवेत, कतार आणि इराणने रविवारी भारतीय राजदूतांना बोलावले होते. आखाती देशातील महत्त्वाच्या देशांनी या टिप्पण्यांचा निषेध करत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती
Wardha: आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)