एक्स्प्लोर
Advertisement
‘अमेरिकेच्या फायद्यासाठी नोटाबंदी’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर आरोप
‘मोदींना अर्थव्यवस्थेचं फारसं ज्ञान नाही. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला.’ असा चव्हाण यांनी आरोप केला.
नागपूर : नोटांबंदी संदर्भात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेच्या फायद्यासाठी घाईघाईत मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय लागू केल्याचा खळबळजनक आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांनी कट रचून भारताला टार्गेट केल्याचं यावेळी चव्हाण म्हणाले. नागपूरमध्ये काही संपादक आणि पत्रकारांशी खासगीत बोलताना चव्हाणांनी हे आरोप केले आहेत.
‘मोदींना अर्थव्यवस्थेचं फारसं ज्ञान नाही. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला.’ असा चव्हाण यांनी आरोप केला.
दरम्यान, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी इतर गोष्टींवरुनही मोदींवर जोरदार टीका केली. ‘बुलेट ट्रेनला सुरेश प्रभूंचा विरोध होता म्हणूनच त्यांच्याकडून रेल्वेमंत्रीपद काढून घेतलं.’ आरोप चव्हाणांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement