एक्स्प्लोर

देशभर राष्ट्रपतींचे शाही सुट धूळखात, जनतेच्या पैशांचा चुराडा

लातूर : इंग्रजांनी आपल्याला खूप देणग्या दिल्या. जशी इंडियन रेल्वे, इंडियन पोस्ट सर्विस, इंडियन आर्मी आणि बरंच काही. त्यांना गांधीबाबांनी पळवून लावलं, तेव्हा जाताना ते इथं बरंच काही सोडून गेले. त्यात बाबूगिरी, सरकारीपणा आणि प्रोटोकॉल नावाचा एक प्रकार आहे. ज्या देशात 28 टक्के जनता गरीब आहे, त्या देशात बाबा आदमच्या काळातील प्रोटोकॉल मोठा अडचणीचा ठरतोय. कारण देशभरात जिथं राष्ट्रपती जातात, तिथं राजेशाही सूट तयार होतो. आणि पुन्हा राष्ट्रपती परत येत नाहीत, तोवर तो बंद असतो. या सूटमधून तुमच्या-आमच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे.     इंग्रज जाऊन 70 वर्ष होत आली. पण या देशानं इंग्रजांचा बडेजाव सोडलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे बदनाम महाराष्ट्रात 8 प्रेसिडेंट सुट तयार करण्यात आलेत. खास करुन राष्ट्रपतींसाठी राखीव असलेल्या या सुटमध्ये केंद्राच्या कॅबिनेट मंत्र्यांनाही प्रवेश मिळत नाही. तसा आदेश राज्यपालांनी 2008 ला बजावलाय. शाही प्रेसिडेंट सुटच्या देखभालीवर करदात्यांचे लाखो रुपये दरवर्षी खर्च होतात.     लातूरला प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी या दोन राष्ट्रपतींनी आठ वर्षात भेटी दिल्या. दोघेही मुक्कामी होते. राष्ट्रपती येणार म्हणून प्रतिभाताईंसाठी दीड कोटी आणि प्रणव मुखर्जींसाठी एक कोटींची साहित्य खरेदी झाली. लातूरच्या प्रेसिडेंट सुटला राष्ट्रपती येऊन गेल्यापासून कुलूप आहे. आतमध्ये प्रवेश नाही.     काय काय आहे या सुटमध्ये?   राष्ट्रपतींसाठी बाथरुमसह सहा एसी   बाथरुमपासून हॉलपर्यंत रेड कार्पेट   शाही सोफे, बेड, 8 झुंबर खरेदी   3 लाखांचे पडदे, 25 हजाराचे हॉट पॉट्स   6 वॉर्डरोब, 18 ड्रेसिंग टेबल   12 हेअर ड्रायर, छोटा, मोठा फ्रिज   दीड लाख रुपयांची तुळशीची रोपं खरेदी     माहिती अधिकारात ही बाब उघड झाली. प्रतिभाताईंसाठी खरेदी केलेलं साहित्य मिळून येत नाही. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाच्या आत रायगड इमारतीतं प्रेसिडेंशिअल सुट आहे. राष्ट्रपतींशिवाय या सुटमध्ये मुख्यमंत्र्यांना राहता येतं. नाशिक, लातूरसह नांदेड, वर्धा, अमरावती, नागपूर, पुणे जळगावात राष्ट्रपतींच्या नावे प्रेसिडेंशिअल सुट आहेत. राष्ट्रपतींच्या नावे हा थाट आणि त्यातलं हे साहित्य बघितल्यावर हा देश विक्रमी संख्येनं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे, असं कोण म्हणेल?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget