एक्स्प्लोर
Advertisement
राज्यात पूर्वमोसमी पावसाची दमदार हजेरी, मुंबईत प्रतीक्षा कायम
राज्यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मुंबई : राज्यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
येत्या आठवड्याभरात मान्सून राज्यात दाखल होणार आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाने वर्दी दिली आहे. या पावसाने नुकसान झालं असलं तरीही उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे.
विदर्भात पावसाची दमदार हजेरी
वर्धा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आज दुपारच्या सुमारास वादळसह मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली.
वर्धा जिल्ह्याच्या रसूलाबाद परिसरात वादळी वाऱ्यानं एका शेतकऱ्याचं कुक्कुटपालनाचं शेड जमीनदोस्त झालं. यात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसंच बोरीबारा गाव शिवारात वीज पडल्यानं एका गाईचा मृत्यू तर दोन गाई जखमी झाल्या.
आष्टी तालुक्यात वादळान चांगलंच थैमान घातलं. काही ठिकाणी रस्त्यावर झाड पडली. कारंजा आर्वी तालुक्यातही वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे काही प्रमाणात का होईना मान्सून पूर्व पावसानं उकाळ्यापासून सुटका झाली.
अकोल्यातही नागरिकांना जोरदार पावसाचा चांगलाच तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी विजेच्या ताराही तुटल्या.
मराठवाड्यातही पावसामुळे नुकसान
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांब समर्थ परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊसाने झोडपलं आहे. अर्ध्या तासाच्या पावसात केळी, डाळिंब, पपई, ऊसासह फळबागांचे नुकसान झालं आहे. घरावरील पत्रेही उडाले आहेत. वादळी वाऱ्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
कोकणातही पावसाची रिमझिम
रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पावसाने हजेरी लावली आहे. महाड, खालापूर, खोपोली, माणगाव परिसरात रिमझिम पाऊस बरसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आंबोली परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. तसंच जिल्ह्यातील अन्य भागात पावसाचा शिडकाव झाला आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक सुरु झालेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं सांगलीकर सुखावले होते.
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, श्रीरामपुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या पहिल्या सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावाजवळील घरांचंही नुकसान झालं आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत, तर अनेक वृक्ष कोसळून पडले आहेत. जीवितहानी झाली नसली तरीही मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे झालं आहे.
नाशिकमध्येही पावसाची शक्यता
पुढील काही तासात नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement