Manoj Jarange Patil : प्रकाश आंबेडकरांची मध्यस्थीची ऑफर, मनोज जरांगे पाटलांकडून त्यांच्याच शैलीत उत्तर!
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना सावध राहण्याचा सल्ला देतानाच मराठा आणि ओबीसीमध्ये तणाव वाढल्याचे वक्तव्य केले.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत (Mumbai) आमरण उपोषणासाठी पदयात्रा सुरू केलेल्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा आज मध्यरात्री पुण्यात (Pune) पोहोचली. त्यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. दरम्यान पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. पुण्याच्या वेशीवर आज पहाटेला सभा पार पडली. या सभेला सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिक पदयात्रेचे स्वागत करत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांना सावध राहण्याचा सल्ला
दुसरीकडून, आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी सुद्धा शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आज कोणतीही सरकारशी चर्चा झाली नसल्याचे मनोज जारंगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टपणे सांगितले. कोणत्याही पद्धतीने सरकारशी चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना सावध राहण्याचा सल्ला देतानाच मराठा आणि ओबीसीमध्ये तणाव वाढल्याचे वक्तव्य केले.
मराठा आणि सामान्य ओबीसींमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नाही
या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सामान्य मराठा आणि सामान्य ओबीसींमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा तणाव नाही. आम्ही गावांमध्ये गुण्यागोविंदाने राहतो. मात्र त्यांच्या निदर्शनात आलं असल्यास आम्ही त्यांचा सल्ला आजवर मानत आलो असल्याचं ते म्हणाले.प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना निजामी मराठे यांच्यापासून सावध राहावे, असाही सल्ला मनोज जरांगे यांना दिला. मात्र, त्यांनी सुद्धा या प्रश्नाला आपल्या शैलीमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले की निझामी मराठे कोण आहेत? मला माहित नाही ते कोण आहेत? हे त्यांना मी खासगीमध्ये विचारेन असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी बोलताना सांगितले की त्यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे त्याचा नेहमीच सन्मान केला आहे, मी खूप सावध असल्याचे ते म्हणाले.
आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी चार चौघांमध्ये जेवण घ्यावं असे प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र,. या वक्तव्यवर्ती त्यांनी मनोज जणांच्या वतीने नाराजी व्यक्त करताना त्यांनी अशा पद्धतीचे जेवणाचे वक्तव्य करावे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या