Prakash Ambedkar : केंद्र आणि राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
केंद्र आणि राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.
Prakash Ambedkar : "मराठा अरक्षणावरून (Maratha Reservation) केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (maharashtra government) मराठा समाजाची फसवणूक करत असून महाविकास आघाडी सरकार भंपक आहे. तर भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे खोटेखोटे रडू आणत आहेत, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीसह केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले,"या चारही सरकारने आपल्या राजकीय फायद्यासाठी कोणताही अभ्यास न करता काही समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत केले आहे. त्यामुळे सरकारकडे इम्पिरिकल डेटा नसल्याने कोर्टाने ताशेरे ओढले आहेत."
काँग्रेसला ऑफर
प्रकाश आंबेडकर यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना किंवा काँग्रेससोबत जाण्याचे सुतोवाच केले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप सोडून कोणत्याही पक्षासोब जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आम्ही काँग्रेसला ऑफर दिली असून आगामी निवडणुकांमध्ये आम्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष सोडून इतर म्हणजे शिवसेना किंवा काँग्रेससोबत समझोता करण्यास तयार आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांवरूनही प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. "रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद जगजाहीर असताना इतर देशांनी आपले नागरिक तत्काळ मायदेशी नेले. परंतु, केंद्र सरकारकडे फॉरेन पॉलिसी नाही. त्यामुळे युक्रेन मधील नागरिक आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- OBC Imperial Data : ओबीसी आरक्षणासाठीचा डेटा कसा आणि किती वेळात गोळा करणार? आयोगाच्या सदस्यांनी स्पष्ट सांगितलं...
- OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा डेटा तयार, राज्य मागासवर्गीय आयोगाची माहिती
- OBC Reservation : राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचे काय? सुप्रीम कोर्टाने केली महत्त्वाची सूचना
- Nawab Malik: नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन नाकारला, 7 मार्चपर्यंत ईडी कस्टडी