एक्स्प्लोर

दौंड तालुक्यात दीड कोटीची वीजचोरी उघडकीस; राजहंस दुग्ध उत्पादक संस्थेवर गुन्हा दाखल

Electricity Theft at Baramati : दौंड तालुक्यात दीड कोटीची वीजचोरी उघडकीस आली असून राजहंस दुग्ध उत्पादक संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Electricity Theft at Baramati : तब्बल 5 वर्षांपासून वीजमीटरमध्ये फेरफार करुन वीजचोरी करणाऱ्या दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्थेवर महावितरणच्या भरारी पथकानं दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

गंलांडवाडी येथील मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्था असून, दुधावर प्रकिया करुन त्याचे उपपदार्थ बनविण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्याकरिता महावितरणकडून त्यांनी औद्योगिक वापराची वीजजोडणी घेतलेली आहे. याच वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी वीज कंपनीला मिळाली होती. त्यानुषंगाने महावितरणच्या बारामती येथील भरारी पथकानं डिसेंबर महिन्यात तपासणी केली. तपासणी दरम्यान वीजमीटरचे सील तोडून फेरफार केल्याचं दिसून आलं. तेव्हा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप शितोळे यांच्या समक्ष पंचनामा करुन वीजमीटर तपासणीसाठी बारामती येथील चाचणी विभागात आणण्यात आलं. तिथेही शितोळे यांच्या समक्ष तपासणी केली. त्यानंतर ज्या कंपनीने ते वीजमीटर बनविलं आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलवून मीटरचा 'एमआरआय' काढण्यात आला. 
 
वीज मीटरचा 'एमआरआय' काढल्यानंतर सदर मीटरमध्ये 10 ऑगस्ट 2016 पासून 9 डिसेंबर 2021 पर्यंत म्हणजेच, मीटर ताब्यात घेईपर्यंत तब्बल 64 महिने वीजचोरी झाल्याचं निष्पन्न झालं. वीजचोरीच्या कालावधीत 24 लाख 75 हजार 168 इतका वीजवापर होणं अपेक्षित होते. परंतु, जादा वापराच्या काळात मीटर बंद करुन फक्त 16 लाख 15 हजार 69 इतकाच वीजवापर होऊ दिला. परिणामी 8 लाख 60 हजार 99 इतक्या युनिटची नोंद मीटरमध्ये झाली नाही. चोरी केलेल्या या युनिटपोटी 1 कोटी 33 लाख 78 हजार 620 आणि विद्युत कायद्यातील तरतुदींप्रमाणे तडजोड शुल्कापोटी 16 लाख 20 हजार असे 1 कोटी 49 लाख 98 हजार 620 रुपयांचे देयक ग्राहकाला देण्यात आलं. मात्र विहीत मुदतीत ग्राहकानं ही रक्कम भरली नसल्यानं प्रथम बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तो यवत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Embed widget