पोस्ट कार्यालयांना इंटरनेट दृष्ट्या बळकट करण्यासाठी खासगी कंपन्यांची सेवा घेण्याची परवानगी द्या ; डॉ. श्रीकांत शिंदेंची मागणी
पोस्ट कार्यालयांना इंटरनेट दृष्ट्या बळकट करण्यासाठी खासगी कंपन्यांची सेवा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली आहे.
Shrikant Shinde : पोस्ट ऑफिसद्वारे विविध योजना, अनुदान आणि आर्थिक मदतीची कामे केली जातात. बहुतांश कामे ऑनलाइन होत असताना पोस्ट ऑफीसमध्ये मात्र, सक्षम इंटरनेट सेवा नसल्याने कामांमध्ये अडथळा येतो. त्यामुळे पोस्ट ऑफिसमधील इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या एमटीएनएल बीएसएनएलची सेवा चांगली करा, अन्यथा कंपन्यांबरोबर इतर खासगी कंपन्यांची सेवा घेण्याचीही मुभा या कार्यालयांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भुमिपूजन मंगळारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार शिंदे कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
कल्याण पूर्वेत ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकात पुतळा, उद्यान, भव्य ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब यांचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे, आंदोलने आणि चळवळींची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचे स्वतंत्र दालन दृक श्राव्य माध्यमातून डॉ. आंबेडकर यांना समजून घेण्यासाठी एक भव्य सभागृह उभारले जाणार आहे. येत्या वर्षभरात या स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार असून या कामाचे भूमीपूजन मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कामाची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यानी केली.
श्रीकांत शिंदे यावेळी मुंबई येथील शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. याबाबत बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालं नव्हतं, महाराष्ट्राच्या राजकारणामधील ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी सूत्रधार कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, सध्या सुरू असेले गलिच्छ राजकारण थांबले पाहिजे."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयाचा निर्णय
Mumbai Bank: 11 तारखेला 11 वाजता हजर व्हा; मुंबई पोलिसांची प्रवीण दरेकरांना चौकशीसाठी नोटीस