एक्स्प्लोर
स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी अल्पवयीन तरुणीही ताब्यात
![स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी अल्पवयीन तरुणीही ताब्यात Police Detains Minor Girl In Suspicion Of Swapnil Sonawane Murder Case स्वप्नील सोनावणे हत्येप्रकरणी अल्पवयीन तरुणीही ताब्यात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/20121116/Navi_Mumbai_Murder-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबईत 15 वर्षीय स्वप्नील सोनावणेच्या हत्ये प्रकरणी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित तरुणीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये हत्या झाल्याचं काल उघड झालं होतं.
नेरुळ पोलिसांनी तरुणीची आई, वडील राजेंद्र नाईक (वडील, वय 50 वर्ष), सागर नाईक (भाऊ, वय 25 वर्ष), साजेश नाईक (भाऊ, वय 22 वर्ष), दुर्गेश पाटील (मित्र, वय 22 वर्ष), आशिष ठाकूर (मित्र, वय 23 वर्ष) आणि एक रिक्षावाला अशा सात आरोपींना अटक केली आहे.
तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या
या प्रकरणातील मृत अल्पवयीन तरुण आणि ताब्यात घेतलेली तरुणी पहिलीपासून एकाच वर्गात शिकत होते. त्यामुळे दोघांची मैत्री होती. मात्र मुलीच्या घरच्यांना ही मैत्री मान्य नसल्याने कुटुंबीयांनी स्वप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली. यानंतर उपचारासाठी स्वप्निलला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)