Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा, 'अशी' असेल मुंबईतील वाहतूक व्यवस्था
PM Narendra Modi Mumbai visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आला आहे.
PM Narendra Modi Mumbai visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्यच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक- ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. शिवाय वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे आज घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे.
बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते- 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरू असेल.
मुंबईतील वाहतूकीतीबाबत वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून वेळोवेळी माहिती मिळणार आहे. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एम एम आर डी ए मैदान आणि मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानका दरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोदींच्या दौर्याच्या दिवशी म्हणजेच गुरवारी हे क्षेत्र उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 250 हून अधिक एसटी बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे. दसरा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा गाड्यांची बल्क बुकिंग करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून या एसटी बसेस येणार आहेत.
हे मार्ग बंद असणार
मुंबई वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे.
संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही.
खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाता येणार नाही.
सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलींकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेश बंदी असेल.
संपूर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत.
पर्यायी मार्ग
दरम्यान, काही मार्ग बंद असले तरी मुंबईकरांनी पर्यायी मार्ग देखील देण्यात आले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलींककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरून कुर्ल्याकडे तसेच पूर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.
संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने
गुरुनानक रूग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथुन कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून
पुढे कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील. खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथून युटर्न घेवून (खेरवाडी वा. वि. हद्दीत ) शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी या. वि. हद्दीत ) टि जंक्शन पुढे वरून कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.
सुर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टीवरून, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे मार्गस्थ होतील.